Join us
Daily Top 2Weekly Top 5

'तुझ्या मासिक पाळीची तारीख काय?' इंटिमेट सीन शूट करण्यापूर्वी अमृताला अनुराग कश्यपने विचारला होता प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 14:01 IST

Amruta subhash:सिक्रेड गेम्स २ मध्ये अमृताने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे.

अलिकडेच नेटफ्लिक्सवर 'लस्ट स्टोरीज 2 ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. जवळपास ४ दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या चार कथा या सिनेमात दाखवल्या आहेत. यात अभिनेत्री, दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्मा हिचीदेखील एक कथा आहे. या कथेमध्ये मराठमोळी अभिनेत्री अमृता सुभाष (amruta subhash) झळकली असून अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला इंटिमेट सीन शूट करताना दिग्दर्शक आणि दिग्दर्शिका यांचा दृष्टीकोन कसा असतो? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देत तिने सिक्रेड गेम्स २मधील इंटिमेट सीन करतानाचा अनुभव सांगितला. यावेळी दिग्दर्शक अनुराग कश्यपने (anurag kashyap) अमृताला तिच्या मासिक पाळीच्या तारखा विचारल्या होत्या.

"सेक्रेड गेम्स २मध्ये अनुराग कश्यपसोबत मी माझा पहिला सेक्स सीन दिला. हा विषय खूप संवेदनशील होता, त्यामुळे तिथे स्त्री किंवा पुरुष दिग्दर्शक यांचा प्रश्नच नव्हता. सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनचं चित्रीकरणावेळी अनुराग कश्यपने त्याच्या डायरेक्शन टीमला बोलावलं होतं. त्यांनी माझ्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळी अनुराग कश्यपने माझ्या मासिक पाळीच्या तारखा विचारण्यास टीमला सांगितलं होतं. कारण, त्यानुसार, शुटिंगचं शेड्युल लावायचं होतं", असं अमृता म्हणाली.

 पुढे ती म्हणते,  "स्त्री किंवा पुरुष यांच्या पलिकडे जाणारा हा विषय आहे. तो खूपच संवेदनशील आहे. त्यामुळे त्याचं दिग्दर्शन करताना स्त्री किंवा पुरुष असं वेगळं काही नसतं."

दरम्यान, सिक्रेड गेम्स २ मध्ये अमृताने एका रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. तर  लस्ट स्टोरीज २ मध्ये तिने कोंकणा सेन शर्माच्या कथेत काम केलं आहे. तिच्या व्यतिरिक्त या सिनेमातील अन्य कथांचं दिग्दर्शन अमित रविंद्रनाथ शर्मा, आर. बाल्की आणि सुजॉय घोष यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :बॉलिवूडलस्ट स्टोरीजसॅक्रेड गेम्सअनुराग कश्यप