Join us

Amruta Fadnavis New Song : शिव तांडव स्तोत्रम्: अमृता फडणवीसांचं आणखी एक गाणं रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 16:28 IST

Amruta Fadnavis New Song : अवघ्या काही तासांत या गाण्याला पाच लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत.

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचं नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. ‘शिव तांडव स्तोत्रम्’ ( Shiv Tandav stotram) असं या गाण्याचं नाव आहे.अमृता यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या नव्या गाण्याची माहिती दिली होती. त्यानुसार आज हे गाणं रिलीज झालं आहे. अमृता यांनी  ट्विटरवर हे गाणं शेअर केलं आहे. यामध्ये अमृता फडणवीस एका साध्वीच्या रूपात शिव तांडव स्तोत्र म्हणताना दिसून येत आहेत.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी हे गाणं दिग्दर्शित केलं आहे. तर शैलेश दानी या गाण्याचे संगीत दिग्दर्शक आहेत. अवघ्या काही तासांत या गाण्याला पाच लाखांवर व्ह्यूज मिळाले आहेत.

याआधी अमृता फडणवीस यांनी गणेशोत्सवात एक गाणं रिलीज केलं होतं. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज्यातील नद्यांवरही एक गाणं गायिलं आहे. तसेच त्यांचं  तिला जगू द्या  हे सुद्धा गाणं विशेष चर्चेत आलं होतं. अमृता फडणवीस सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहेत. कधी राजकीय टिप्पणीमुहे तर कधी गाण्यांमुहे.

टॅग्स :अमृता फडणवीस