Join us
Daily Top 2Weekly Top 5

Amrita Singh's Birthday: ‘बॉयफ्रेन्ड’नं चॅलेंज दिलं अन् अमृता सिंग विनोद खन्नापायी वेडी झाली...; एक अशीही लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2023 08:00 IST

Amrita Singh's Birthday : नर्गिस-राज, रेखा-अमिताभ, सलमान-ऐश्वर्या, शाहिद-करिना ही बॉलिवूडची गाजलेली अफेअर्स. पण याशिवाय आणखी एक बॉलिवूडचं अफेअर असंच गाजलं होतं...

Amrita Singh's Birthday : नर्गिस-राज, रेखा-अमिताभ, सलमान-ऐश्वर्या, शाहिद-करिना ही बॉलिवूडची गाजलेली अफेअर्स. पण याशिवाय आणखी एक बॉलिवूडचं अफेअर असंच गाजलं होतं. ते अफेअर होतं अमृता सिंग (Amrita Singh) व विनोद खन्नाचं (Vinod Khanna). होय, सैफ अली खानशी लग्न होण्याआधी अमृताचं नाव अनेकांशी जोडलं गेलं होतं. अगदी त्याकाळचा दिग्गज क्रिकेटपटू रवी शास्त्रीसोबतही ती सीरिअस रिलेशनशिपमध्ये होती. विशेष म्हणजे, रवी शास्त्रींमुळेचविनोद खन्ना आणि तिच्या अफेअरची सुरूवात झाली होती. होय, रवी शास्त्रीनं गमती गमतीत अमृताला चॅलेंज केलं आणि मग काय अमृता जणू जिद्दीलाच पेटली. अगदी हात धुवून विनोद खन्नाच्या मागे लागली.

तर हा किस्सा आहे 1989 सालचा. अमृता व रवी शास्त्री रिलेशनशिपमध्ये होते. अशात अमृताने विनोद खन्नासोबत सिनेमा साईन केला. मित्रांनी सहज म्हणून रवी शास्त्रीला ‘वॉर्न’ केलं. अरे, तिने विनोद खन्नासोबत सिनेमा साईन केलाये, तेव्हा जरा लक्ष ठेव.., असं मित्र म्हणाले. मित्रांनी असं वॉर्न केल्यावर कुठलाही बॉयफ्रेन्ड बेचैन होईल. रवी शास्त्रींच्या बाबतीतही वेगळं नव्हतं. एकेदिवशी रवी शास्त्रींनी अगदी गमती गमतीत अमृताला यावरून डिवचलंच. तू काहीही कर, तू काही विनोद खन्नाला इम्प्रेस करू शकत नाही, असं तो म्हणाला आणि इथेच सुरूवात झाली. तिने चॅलेंज स्वीकारलं आणि ती विनोद खन्नाच्या मागे हात धुवून लागली.

अमृता व विनोद खन्ना यांना आऊटडोअर शूटींगवर जाण्याची संधी मिळाली. अमृताने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. अमृताने पूर्ण प्रयत्न केलेत आणि ती यात यशस्वीही ठरली. विनोद खन्नाही हळूहळू तिच्यात गुंतू लागला. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवू लागले. अमृता तर विनोद खन्नाच्या प्रेमात ठार वेडी झाली होती. तोपर्यंत अमृता व रवी शास्त्रींच्या भांडणाच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. अमृताला सोडून रवी शास्त्रींनी करिअरवर फोकस करण्याचा निर्णय घेतला आणि अमृता व विनोद खन्नाच्या लव्हस्टोरीचा मार्ग मोकळा झाला. शूटींगच्या दुसऱ्या टप्प्यात हे प्रेम आणखीच बहरलं. कानोकानी याची चर्चा सुरू झाली.

अमृता तिच्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या विनोद खन्नाच्या प्रेमात पडल्याची खबर तिच्या आईच्या कानावरही गेली. असं म्हणतात की, आईने लगेच अमृताला विनोद खन्नापासून दूर राहण्याची सूचना केली. आई प्रेमात आडवी आल्यावर, अमृताने भावनांना आवर घातला. आईच्या मनाविरूद्ध जाणं तिला मान्य नव्हतं. यानंतर अमृताने विनोद खन्नांपासून ब्रेकअप केलं. याच काळात विनोद खन्नाही आध्यात्मात गुंतला आणि ही लव्हस्टोरी संपुष्टात आली.

काही वर्षानंतर अमृताने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान सैफ अली खानसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. एका फोटोशूटदरम्यान दोघांची ओळख झाली आणि काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. अर्थात नंतर दोघांचा घटस्फोटही झाला.

टॅग्स :अमृता सिंगविनोद खन्नासैफ अली खान रवी शास्त्रीबॉलिवूड