Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर सैफला नव्हती मुलांना भेटायची परवानगी; अमृता सिंगने घेतला होता मोठा निर्णय,कारण..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 11:48 IST

Saif ali khan: कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर अमृताने सैफला तिच्या मुलांना भेटण्यास नकार दिला होता.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान ( saif ali khan) आणि अमृता सिंग (amrita singh) यांचा घटस्फोट होऊन बरीच वर्ष झाली आहेत. घटस्फोटानंतर सैफने अभिनेत्री करीना कपूरसोबत (kareena kapoor) दुसरा संसारही थाटला आहे. इतकंच नाही तर त्यांना तैमुर आणि जहांगीर ही दोन मुलंदेखील आहेत. मात्र, तरीदेखील सैफ आणि अमृता यांच्या लग्नाविषयी वा त्यांच्या घटस्फोटाविषयी आजही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगते. यामध्येच घटस्फोटानंतर अमृताने सैफला तिच्या मुलांना भेटण्याची परवानगी नाकारली होती अशी चर्चा होत आहे. म्हणूनच, नेमक्या कोणत्या कारणामुळे अमृता सैफ आणि मुलांची भेट होऊ देत नव्हती या मागचं कारणं जाणून घेऊयात.

सैफ आणि अमृता या दोघांच्या वयात बरंच अंतर होतं. अमृता सैफपेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. मात्र, तरीदेखील या दोघांनी १९९१ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यावेळी अमृता प्रसिद्धीच्या शिखरावर होती. तर, सैफ स्ट्रगल करत होता. त्यामुळे कुटुंबाच्या विरोधात जाऊन या दोघांनी लग्न केलं. जवळपास १३ वर्ष ही जोडी एकत्र राहिली. मात्र, त्यानंतर २००४ मध्ये ते विभक्त झाले. विशेष म्हणजे कायदेशीररित्या विभक्त झाल्यानंतर अमृताने सैफला तिच्या मुलांना भेटण्यास नकार दिला होता.

या कारणामुळे सैफ आणि मुलांच्या भेटीवर अमृताला होता आक्षेप

सैफ आणि अमृताचा घटस्फोट झाल्यानंतर मुलांची कस्टडी अमृता सिंगकडे होती. त्यामुळे ती सारा अली खान आणि इब्राहिम अली खान या दोन मुलांसोबत राहत होती. याच काळात सैफ आणि इटालियन मॉडल रोजा यांच्या अफेअरच्या चर्चा सुरु होत्या. त्यामुळे त्यांच्या नात्याचा परिणाम मुलांवर होऊ नये यासाठी अमृता सैफ आणि मुलांची भेट होऊ देत नव्हती.

दरम्यान, सैफसोबत अनेकदा रोजादेखील असायची. त्यामुळे रोजा मुलांच्या मनात आपल्याविषयी काही तरी द्वेष निर्माण करेल या भीतीपोटी अमृता, सैफ आणि मुलांची भेट होऊ देत नव्हती.परंतु, रोजा आणि सैफचं नातंही फार काळ टिकलं नाही. त्यानंतर सैफने २०१२ मध्ये करीना कपूरसोबत लग्न केलं.

टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगसारा अली खानबॉलिवूडसेलिब्रिटी