Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ यांचा नातू अगस्त नंदा करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री! अ‍ॅक्टिंग नाही तर ‘हे’ आहे ‘पॅशन’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2018 18:32 IST

आता आणखी एक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये सज्ज आहे आणि याचे थेट कनेक्शन महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी आहे.

स्टार किड्सच्या बॉलिवूड एन्ट्रीचा ‘सिलसिला’ थांबणारा नाहीच. होय, या मुद्यावर ‘नेपोटिजम’वर कितीही तावातावात चर्चा झाली, तरी स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये येणारचं. आता आणखी एक स्टारकिड्स बॉलिवूडमध्ये सज्ज आहे आणि याचे थेट कनेक्शन महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी आहे. होय, हा स्टारकिड्स दुसरा-तिसरा कुणी नसून अमिताभ यांचा नातू अगस्त्य नंदा आहे. म्हणजे, अमिताभ यांची कन्या श्वेता नंदा बच्चन हिचा मुलगा. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांची नात आणि अगस्त्यची बहीण नव्या नवेली नंदा हिच्या बॉलिवूड डेब्यूचीही चर्चा झाली होती. पण नव्या सध्या तिच्या उच्च शिक्षणात बिझी आहे. अगस्त्यने मात्र बॉलिवूड डेब्यूची तयारी सुरू केली आहे आणि आजोबा अमिताभचा त्याला पाठींबा आहे. 

सूत्रांचे मानाल तर नव्याआधी अगस्त्य बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकतो. पण अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून. होय, अगस्त्यला फिल्म मेकिंगमध्ये रस आहे. आजोबांकडे त्याने आपला हा इंटरेस्ट बोलून दाखवला. तूर्तास अगस्त फिल्म मेकिंगचे धडे गिरवतो आहे.  मॉम श्वेता नंदा आणि डॅड निखील नंदा हेही मुलाच्या या निर्णयाचे खूश असल्याचे कळतेय.अलीकडे अगस्त्यने एक शॉर्टफिल्म बनवली. ती पाहून अमिताभ आणि जया बच्चन खूप प्रभावित झालेत. अगस्तची शॉर्टफिल्म युट्यूबवर तुम्ही पाहू शकता. या शॉर्टफिल्मची स्क्रिप्ट स्वत: त्याने लिहिली असून दिग्दर्शनही त्याचे आहे. याचे बॅकग्राऊंड म्युझिकही त्याचेच आहे.

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. ४४ वर्र्षांची श्वेता ही अमिताभ व जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखील नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. 

टॅग्स :अमिताभ बच्चन