Join us

'उशीरा का होईना पण दिखावा..',' अंबानींच्या फंक्शनला गेलेल्या बिग बींची Cryptic पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 13:07 IST

Amitabh bachchan: अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच अनंत-राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी पोस्ट केली. त्यामुळे नेटकरी या पोस्टचा अर्थ अंबानींच्या कार्यक्रमाशी जोडत आहेत.

गुजरातमधील जामनगर येथे मुकेश अंबानी (mukesh ambani) यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं नुकतंच प्री वेडिंग फंक्शन पार पडलं. या फंक्शनमध्ये देशविदेशातील अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे या प्री वेडिंग फंक्शनमध्ये बॉलिवूड कलाकारही सहभागी झाले होते. त्यात अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) यांचाही समावेश होता. मात्र, हा कार्यक्रम झाल्यानंतर बिग बींनी एक क्रिप्टिक पोस्ट केली आहे. ज्यामुळे लोकांचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं आहे.

अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम त्यांचे विचार ट्विटरवर मांडत असतात. यात नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात 'दिखावा' या शब्दाचा वापर केला आहे. त्यामुळे लोकांनी त्यांच्या या पोस्टचा संबंध अनंत-राधिकाच्या ग्रँड प्री-वेडिंग फंक्शनशी जोडला आहे.

'उशीरा का होईना पण, पण दिखावा कधीच नाही,' असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग फंक्शनविषयी भाष्य केलं.

नेमकी काय आहे अमिताभ बच्चन यांची पोस्ट?

"रविवारी जलसाचे दरवाजे उघडले नाहीत. पण, एका लग्नमंडपाचा दरवाजा नक्कीच उघडला. लग्नाच्या लोकेशनपर्यंत आणि तिथपासून परत येईपर्यत. यापूर्वी असा अनुभव कधीच घेतला नाही. फक्त लग्नच नाही तर वनतारा अॅनिमल रिलिफ फॅसिलिटी सुद्धा. हे भगवान... काय अद्भूत अनुभव होता. आणि, त्या पशूसांठी करण्यात आलेली खास सुविधा. ज्या प्राण्यांवर अन्याय होतो. त्यांना सगळ्यांना या फार्ममध्ये आणलं जातं. त्यांचं पालन-पोषण केलं जातं..तुम्ही सगळे नक्कीच या ठिकाणाला भेट द्या", असं बिग बी म्हणाले.

पुढे ते म्हणते, "त्यानंतर श्लोकांचे स्वर, मंत्रोच्चार, पाहुण्यांच्या स्वागतासाठी दिव्य माहोल...सगळं अविश्वसनीय होतं. आजच्यासाठी तरी ही आनंदाची रात्र आहे." दरम्यान,  अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनला अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन यांनी हजेरी लावली होती. यावेळी बिग बींची नात अनेकांच्या चर्चेचा विषय ठरली होती.

टॅग्स :अमिताभ बच्चनअनंत अंबानीबॉलिवूडसेलिब्रिटी