Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला दुर्मिळ विष्णू मंदिराचा व्हिडीओ; १३४ वर्ष जुनं मंदिर नेमकं आहे कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 10:31 IST

अमिताभ बच्चन यांनी १३४ वर्षे जुन्या ऐतिहासिक 'हिंदू विष्णू मंदिरा'चा एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. हे मंदिर अनेकांना माहितच नाही. चाहते थक्क झाले आहेत

बॉलिवूडचे 'शहेनशहा' अमिताभ बच्चन यांच्या सोशल मीडिया पोस्ट अनेकदा चर्चेत असतात. नुकतीच अमिताभ यांनी केलेली एक पोस्ट सध्या इंटरनेटवर व्हायरल होतेय. लोक या पोस्टला त्यांची या वर्षातील सर्वात माहितीपूर्ण पोस्ट म्हणत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी इराणमधील 'बंदर अब्बास' या शहरात असलेल्या १३४ वर्षे जुन्या ऐतिहासिक 'हिंदू विष्णू मंदिरा'चा एक अप्रतिम व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून भारत आणि इराणमधील जुन्या सांस्कृतिक संबंधांची झलक पाहायला मिळते.

इराणमधील एकमेव विष्णू मंदिराची झलक

अमिताभ बच्चन यांनी हा व्हिडिओ त्यांच्या x, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले की, "इराणच्या बंदर अब्बास शहरात असलेले प्राचीन हिंदू विष्णू मंदिर. १८९२ मध्ये काजर राजवटीच्या काळात येथे काम करणाऱ्या भारतीय हिंदू व्यापाऱ्यांसाठी हे मंदिर बांधण्यात आले होते. व्हिडिओमध्ये मंदिराची पुरातन वास्तुकला, भगवान विष्णूच्या मूर्ती आणि सुंदर कोरीव काम दिसत आहे. तसेच तिथे एक बोर्डही लावलेला दिसतो, ज्यावर राष्ट्रीय संरक्षित कृष्ण मंदिर असे लिहिले आहे.


चाहत्यांनी मानले आभार

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. फेसबुकवर एका युझरने लिहिले, "तुम्ही पहिल्यांदाच इतकी सुंदर आणि ऐतिहासिक माहिती शेअर केली आहे, तुमचं कौतुक करावं तितकं कमी." तर दुसऱ्या एका युझरने म्हटले, "ही तुमची या वर्षातील सर्वोत्तम पोस्ट आहे."

भारत आणि इराणमध्ये अनेक शतकांपासून संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होते. भारतीय भाषा आणि संगीतावरही इराणच्या फारसी संस्कृतीचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे अमिताभ यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ खूप खास आहे.

अमिताभ बच्चन यांचे आगामी चित्रपट

अमिताभ बच्चन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ते लवकरच'कल्की २८९८ एडी' (Kalki 2898 AD) च्या सिक्वेलमध्ये दिसणार आहेत, ज्यासाठी त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच कमल हासन यांच्यासोबत शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ते ब्लॉग आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी नेहमी जोडलेले असतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan shares rare Vishnu temple video: 134-year-old temple location?

Web Summary : Amitabh Bachchan shared a video of a 134-year-old Vishnu temple in Iran's Bandar Abbas, built for Indian traders in 1892, highlighting ancient India-Iran ties. Fans praised the informative post. Bachchan will soon appear in 'Kalki 2898 AD'.
टॅग्स :अमिताभ बच्चनइराणबॉलिवूड