Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील या चिमुरडीला ओळखले का? आज बॉलिवूडवर करतेय राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 11:51 IST

या फोटोत अमिताभ आणि जया यांच्यासोबत काही लहान मुलांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील चिमुरडी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांच्या कडेवरील ही मुलगी करिना कपूर असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत आपल्याला करिश्मा कपूरला देखील पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांच्या एका फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. या फोटोत अमिताभ आणि जया यांच्यासोबत काही लहान मुलांना आपल्याला पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील चिमुरडी तर अतिशय गोंडस असून ही मुलगी कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. सोशल मीडियाद्वारे हा प्रश्न अनेकांनी अमिताभ बच्चन यांना विचारला आहे. सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असलेल्या अमिताभ यांनी देखील लगेचच ट्वीटद्वारे या मुलीबद्दल त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे. ही मुलगी दुसरी कोणी नसून आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे. 

 

अमिताभ बच्चन यांच्या कडेवरील ही मुलगी करिना कपूर असून या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोत आपल्याला करिश्मा कपूरला देखील पाहायला मिळत आहे. करिना लहान असतानाचा अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आणखी एक फोटो देखील काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अमिताभ बच्चन यांनीच सोशल मीडियावर हा फोटो शेअर केला होता. 

अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला तो फोटो १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला पुकार चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा होता. या फोटोत अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक मुलगी आणि नर्स पाहायला मिळाली होती. अमिताभ बच्चन यांनी फोटो शेअर करत असताना त्यासोबत कॅप्शन लिहिले होते की, ती मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून करिना कपूर आहे. फोटो शेअर करत बिग बींनी लिहिले होते की, ओळखा ही कोण आहे? ही करिना कपूर आहे. हा फोटो जेव्हा गोव्यात पुकारमध्ये शूटिंग चालू होते त्यावेळचा आहे. त्यावेळी करिना तिचे वडील रणधीर कपूर यांच्यासोबत सेटवर आली होती. त्यावेळी तिच्या पायाला जखम झाली होती आणि त्यामुळे तिच्या पायाला औषध लावले जात होते.

टॅग्स :अमिताभ बच्चनकरिना कपूरकरिश्मा कपूर