हिंदी सिनेसृष्टीत आपलं नाव गाजवणारे बॉलिवूडचे बिग बी अर्थातच अमिताभ बच्चन. बिग बी यांची लोकप्रियता आजही कायम आहे. त्यांना बॉलिवूडचे महानायक याबरोबरच अँग्री यंग मॅन म्हणूनही ओळखले जाते. अशातच अमिताभ बच्चन यांनी 'पुष्पा 2' स्टार अल्लू अर्जुनचं कौतुक केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अल्लू अर्जुनच्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ शेअर करत अमिताभ यांनी पोस्ट शेअर केली आहे. त्या व्हिडीओमध्ये अमिताभ यांचं अल्लू अर्जुनने मोठ्या मनाने कौतुक करताना दिसतोय. एका कार्यक्रमात अल्लूला विचारण्यात आले की, कोणता बॉलिवूड अभिनेता तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो? यावर तो म्हणाला होता, "अमिताभ हे मला सर्वात जास्त प्रेरित करतात. लहानपणापासून त्याचे चित्रपट बघत मोठा झालो आहे. त्यांचा माझ्यावर खोलवर प्रभाव आहे. मी त्याचा मोठा चाहता आहे. या वयात ते ज्या पद्धतीने काम करत आहेत, ते खरोखरच अप्रतिम आहे".
अल्लू अर्जूनच्या तोंडून कौतुक ऐकल्यानंतर अमिताभ यांनी त्याचे आभार मानलेत. अल्लू अर्जूनचं कौतुक करत अमिताभ यांनी लिहलं, "अल्लू अर्जुन जी... तुमच्या दयाळू शब्दांनी भारावलो... तुम्ही मला माझ्या पात्रतेपेक्षा जास्त दिलं.. आम्ही सर्वजण तुमच्या कामाचे आणि प्रतिभेचे मोठे चाहते आहोत... तुम्ही आम्हा सर्वांना प्रेरणा देता.. तुमच्या यशासाठी माझ्या प्रार्थना आणि शुभेच्छा आहेत!". दरम्यान, याआधीही अल्लू अर्जुनने 'कल्की 2898 एडी' चित्रपट पाहून अमिताभ बच्चन यांचे कौतुक केले होते. चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी एक लांबलचक नोट शेअर केली होती.