Join us

१० वर्षांपासून रखडलेला 'शूबाईट' सिनेमा अखेर रिलीज होणार, ओळखूच येणार नाही असा अमिताभ यांचा लूक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:45 IST

अमिताभ यांचा १० हून अधिक वर्ष रखडलेला शूबाईट सिनेमा अखेर रिलीजसाठी सज्ज झालाय, बातमी क्विक करुन तुम्ही बिग बींचा थक्क करणारा लूक पाहू शकता

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते म्हणून ओळखले जातात. अमिताभ यांनी विविध सिनेमांमधून गेली अनेक दशकं लोकांच्या मनावर राज्य केलंय. अमिताभ यांचे सिनेमे अनेक पिढ्यांपासून लोकांचं मनोरंजन करत आहेत. अमिताभ यांचे सिनेमे रिलीज होण्यासाठी सहसा कोणतीही अडचण येत नाही. पण अमिताभ यांचा एक सिनेमा गेली १० वर्ष रिलीज झालाच नाही. हा सिनेमा म्हणजे 'शूबाईट'. अखेर या सिनेमाचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.

'शूबाईट' सिनेमा २०१२ साली बनवला गेलाय. सरदार उधम, विकी डोनर, पिकू असे सिनेमे बनवणाऱ्या शूजीत सरकार यांचा खरंतर हा पहिला सिनेमा. आणि ते सुद्धा अमिताभ यांच्यासोबत. पण हा सिनेमा रिलीज होऊच शकला नाही. इतकंच नव्हे तर स्वतः २०१५ ला अमिताभ यांनी सिनेमा रिलीज करण्यासाठी निर्मात्यांना आवाहन केलं. अखेर स्वतः शूजीत सरकार हा सिनेमा रिलीज करणार आहेत.

२०१२ ला अनेक वादविवादांमुळे हा सिनेमा रिलीज होऊ शकला नाही.  पण या सिनेमाची कथा आणि क्रिएटिव्हीटी या दोन्ही गोष्टींवर शूजीत आणि बिग बी दोघांनाही विश्वास आहे. त्यामुळे शूजीत हा सिनेमा लवकरच भारतभर रिलीज करतील.  या सिनेमातला बिग बींचा लूक पाहून तुम्ही त्यांना ओळखू शकणार नाही. रणरणत्या वाळवंटात बिग बी यांचा थकलेला चेहरा पाहून त्यांना ओळखूच येणार नाही. सर्वांना 'शूबाईट' सिनेमाची उत्सुकता आहे.

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूड