सध्या अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कौन बनेगा करोडपती(Kaun Banega Crorepati)चा सोळावा सीझन होस्ट करत आहेत. बिग बी वयाच्या ८२ व्या वर्षीही काम करत राहून अनेकांना प्रेरणा देत आहे. शोदरम्यान अमिताभ बच्चनही त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक किस्से सांगत असतात. अलिकडेच, बिग बींनी कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर खुलासा केला की जेव्हा त्यांना त्यांची पत्नी जयाचा फोन येतो तेव्हा ते घाबरतात.
कौन बनेगा करोडपती १६च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला की जेव्हाही त्यांच्या घरी पाहुणे येतात आणि त्यांना एकट्यात बोलायचे असते तेव्हा जया बच्चन बंगालीमध्ये बोलतात. त्यावेळी तो एकही शब्द कळत नसतानाही सर्व काही समजत असल्याचा आव आणावा लागतो. याबद्दल बिग बी म्हणाले की, जेव्हा कोणी पाहुणे येतात आणि तेव्हा त्यांच्यासमोर एकट्यात काही बोलायचे असते, तेव्हा जया नेहमी बंगालीत बोलतात, आणि मी समजले आहे असे दाखवतो. पण प्रत्यक्षात मला काहीच समजत नाही. नुकतीच जया गोव्यात एका चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि मला तिचा फोन आला. सहसा, आम्ही मेसेसद्वारे बोलतो, परंतु यावेळी, तिने कॉल केला आणि मी घाबरलो. जेव्हा माझी पत्नी फोन करते तेव्हा मी घाबरून जातो, काय होणार आहे हे मला कळत नाही.
बिग बींना बंगाली भाषेतले येतात फक्त हे दोन शब्द
अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, "मी संकोचित होतो आणि कॉलला उत्तर दिले, काय झाले ते मला कळत नव्हते. आजूबाजूला लोक असल्याने तिने बंगालीमध्ये बोलायला सुरुवात केली आणि मला एकही शब्द समजू शकला नाही. मी फक्त 'हा हा' म्हणालो पण नंतर काही वेळाने, मी म्हणालो की ती काय बोलत आहे ते मला समजत नाही, म्हणून कधीकधी, जर तुम्ही मला बंगाली बोलण्यास सांगितले, तर मी फक्त दोन शब्द बोलू शकेन, बेसी जेन ना, एक्तू एक्तू जाने.