Join us

Amitabh Bachchan : चाहत्यांना भेटायला अनवाणी का जातात बिग बी? अमिताभ बच्चन यांच्या उत्तराने जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2023 17:46 IST

दर रविवारी आणि बिग बींच्या वाढदिवसालाl त्यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी असते.

गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. वयाच्या ८० व्या वर्षी सुद्धा ते तितक्याच जोमाने काम करत आहेत. त्यांचा चाहतावर्गही काही कमी नाही. फक्त जुन्या पिढीचे लोकच नाही तर आजकालची तरुण पिढीही बिग बींची फॅन आहे. ते सुद्धा आपल्या चाहत्यांचा किती आदर करतात याचा प्रत्यय नुकताच आला आहे.

दर रविवारी आणि बिग बींच्या वाढदिवसाला अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांची गर्दी असते. अनेक चाहते तासनतास बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी उभे असतात. अनेकांच्या हातात बॅनरही असतात ज्यावर आपल्या आवडत्या अभिनेत्याविषयी छानसा संदेश लिहिला असतो. तर अमिताभ बच्चन नियमित चाहत्यांना भेटण्यासाठी बाहेर येतात. गेटजवळ उंच ठिकाणी उभे राहून ते सर्वांना हात दाखवतात. त्यांना पाहून चाहते अक्षरश: जल्लोष करतात. यावेळी एक लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे बिग बी पायात चप्पल न घालताच बाहेर आल्याचं दिसतं. 

चाहत्यांना भेटतानाचा एक फोटो शेअर करत बिग बींनी कॅप्शनमध्ये लिहिले, "यावर अमिताभ बच्चन यांना अनेकदा विचारण्यात आलं की तुम्ही अनवाणीच चाहत्यांना भेटायला का जाता? तर यावर ते म्हणतात, हो मी अनवाणी जातो. तुम्ही मंदिरात चप्पल काढून जाता. मग रविवारी माझे चाहतेच माझ्यासाठी मंदिर आहे. तुम्हाला काही अडचण आहे का!"

अमिताभ बच्चन किती विनम्र आहेत हे त्यांच्या पोस्टमधून पुन्हा एकदा सिद्ध झालंय. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी 'आपका अंदाज ही निराला है' अशा कमेंट केल्या आहेत.

टॅग्स :अमिताभ बच्चनसोशल मीडिया