Join us

32 वर्षानंतर शहेनशहा अन् थलायवा येणार एकत्र; अमिताभ-रजनीकांत झळकणार एकाच सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 13:35 IST

Amitabh bachchan: रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकार म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रजनीकांत. या दोन्ही कलाकारांनी आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात आणि खासकरुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. एकीकडे अमिताभ बच्चनबॉलिवूड गाजवतात. तर, दुसरीकडे रजनीकांत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवतात. त्यामुळे या कलाकारांचा सिनेसृष्टीवर असलेला दबदबा साऱ्यांनाच ठावूक आहे. आजवरच्या कारकिर्दीत या दोन्ही कलाकारांनी काही मोजक्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली. त्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.

'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, तब्बल ३२ वर्षानंतर रजनीकांत आणि अमिताभ बच्चन हे रुपेरी पडद्यावर एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.  'थलैवर 170' या सिनेमामध्ये ही जोडी एकत्र दिसणार असून या सिनेमाविषयी आता प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमाची निर्मिती लायका प्रोडक्शन अंतर्गत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, रजनीकांत यांनी नुकतंच त्यांच्या जेलर सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे. सध्या ते लाल सलाम या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त झाले आहेत. त्यानंतर ते टी.जे. गुणनवेल यांच्या 'थलैवर 170' या सिनेमाचं शुटिंग सुरु करणार आहेत. या सिनेमात अमिताभ बच्चन स्क्रीन शेअर करणार आहेत. यापूर्वी रजनीकांत आणि अमिताभ बच्चन यांनी 'हम', 'अंधा कानून', 'गिरफ्तार' या सिनेमाममध्ये एकत्र काम केलं आहे. 

टॅग्स :रजनीकांतअमिताभ बच्चनसेलिब्रिटीबॉलिवूड