Join us
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या जीवाला धोका... अमिषा पटेलचं ट्विट चर्चेत, अभिनेत्रीवर फसवणुकीचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 16:08 IST

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा वादात सापडली आहे, खंडवा येथील कोतवाली पोलिस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल पुन्हा एकदा वादात सापडली असून, पैसे घेऊन एका कार्यक्रमात काही मिनिटांसाठी गेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे, याप्रकरणी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. खरे तर हे प्रकरण खंडवा येथील कोतवाली पोलिस ठाण्यात आहे. अमिषाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल शनिवारी खंडवा जिल्ह्यातील माँ नवचंडी देवीधामच्या कार्यक्रमात पोहोचली होती. कार्यक्रमातील एका तासाच्या परफॉर्मन्ससाठी अमिषा पटेलने सुमारे ४ लाख रुपये घेतले होते. मात्र कार्यक्रमात केवळ 3 मिनिटांचा परफॉर्मेन्स देऊन अमिषा इंदूरला रवाना झाली. अभिनेत्रीच्या या वागण्याला शहरातील सामाजिक कार्यकर्ते विरोध करत आहेत. रविवारी सिटी कोतवाली येथे अमिषावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी सुमारे 5 ते 7 हजार प्रेक्षक जमले होते.

मात्र, अमिषा स्वतः आयोजकांवर संतापली आहे. तिने तिच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत लिहिले, "मध्य प्रदेशातील खंडवा शहरात काल 23 एप्रिल रोजी नवचंडी महोत्सव 2022 ला उपस्थित राहिले.. श्री अरविंद पांडे यांनी आयोजित केलेले खूप वाईट. माझ्या जीवाला धोका होता. मला स्थानिक पोलिसांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी माझे योग्य संरक्षण केले. अमिषाने खराब व्यवस्थेमुळे कार्यक्रम सोडल्याबद्दल लिहिले आहे.

आमिषा आणि वादविशेष म्हणजे अमिषाचे नाव अशाप्रकारे वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. कार्यक्रमाला उशिरा पोहोचणे, कार्यक्रम न करणे किंवा आयोजकांशी भांडणे या कारणांमुळे ती यापूर्वी अनेकदा चर्चेत आली आहे.

 अलीकडे, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सोनिया गांधी यांच्या अत्यंत जवळचे असलेले दिवंगत नेते अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांच्याशी असलेल्या तिच्या अफेअरच्या बातम्यां मुळे ती चर्चेत होती. 

टॅग्स :अमिषा पटेलगुन्हेगारीसेलिब्रिटी