Join us  

Amir Khan : आमिर खानला मिळायचे महिन्याला हजार रुपये, प्रसिद्धीनंतर आली 'अशी' वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 1:54 PM

एका मुलाखतीत आमीर खान ने त्याच्या इंटस्ट्रीतील स्ट्रगलविषयी सांगितले. त्याच्या पहिल्या मानधनाविषयीही त्याने खुलासा केला.

बॉलिवुडचा 'मिस्टर पर्फेक्शनिस्ट' आमिर खान त्याच्या पहिल्याच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. 'कयामत से कयामत तक' या सिनेमातुन त्याने बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. जुही चावला सोबत त्याची जोडी खुप पसंत केली गेली. हा चित्रपट लोकांनी डोक्यावर घेतला होता. त्यातली गाणीही प्रचंड गाजली होती.

पहिल्या चित्रपटासाठी मिळायचे केवळ १००० रुपये 

एका मुलाखतीत आमीर खान ने त्याच्या इंटस्ट्रीतील स्ट्रगलविषयी सांगितले. त्याच्या पहिल्या मानधनाविषयीही त्याने खुलासा केला. तो म्हणाला, 'मी कधीच अवॉर्डसाठी काम केले नाही. मी असे बोलायला नको पण अवॉर्ड्सवर मला शंका येते. अवॉर्डविषयी माझ्या मनात फारसा सम्मान नाही. अवॉर्ड जिंकणे माझ्यासाठी अजिबातच मोठं नाही. पण सिनेमा बनवण्याचा अनुभव नक्कीच मोठा आहे. मंन्सूर अली खान हे फार मोठे दिग्दर्शक आहेत. मी त्यांच्याकडुन बरंच काही शिकलो. माझ्यात झपाट्याने सुधारणा झाली. कयामत से कयामत तक वेळी मी केवळ त्यांचा अभिनेताच नव्हतो तर असिस्टंट डायरेक्टरही होतो. मी महिन्याला १००० रुपये कमवत होतो. तेव्हा माझ्यासाठी एवढे पुरेसे होते.'

प्रसिद्धी मिळाल्यानंतर काय झाले ?

'कयामत से कयामत' तक रिलीज झाल्यानंतर प्रत्येक जण मला ओळखू लागला. लोकं थिएटरमध्ये गर्दी करत होते. हे बघून मला धक्काच बसला. मला मन्सूर आणि जुहीचे काम जास्त आवडले होते. मला वाटले माझे काम एव्हरेज आहे. मी रातोरात स्टार झालो होतो. मला स्टारडमचा अर्थही माहित नव्हता. मी खुलेआम फिरु शकत नव्हतो. एखाद्या हॉटेलमध्ये राहायला गेल्यावर पूर्ण स्टाफ बोलायला येत होता. मी फार लाजाळू होतो. हे सर्व न झेपणारं होतं.'

Malaika Arora : मलायका अरोरा अर्जुन कपुरसोबत लग्न करणार ? तिनेच केला खुलासा

सध्या आमिर खान ने चित्रपटातून ब्रेक घेतला आहे. त्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. काजोलच्या 'सलाम व्हेंकी मध्ये' आमिर खान चा कॅमिओ बघायला मिळणार आहे.

टॅग्स :आमिर खानहिंदीसिनेमा