Join us
Daily Top 2Weekly Top 5

"शूटिंग करताना अचानक मोठे स्फोट...", इराण-इस्त्रायल युद्धादरम्यान दुबईत अडकलेल्या लारा दत्ताला अश्रू अनावर, सांगितली सत्य परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:02 IST

Iran-Israil War:दुबईत लेकीसह अडकलीये लारा दत्ता, अभिनेत्रीला बोलताना रडूच कोसळलं, म्हणाली-" भारतात येण्याचा प्रयत्न करतेय पण..."

Iran-Israil War lara Duta Stuck In Dubai: अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात संयुक्त मोहीम हाती घेऊन त्या देशावर जोरदार हल्ले केले. मात्र,इराणनेही इस्रायलसह कतार, कुवेत, बहारिन, संयुक्त अरब अमिराती इथल्या अमेरिकी लष्करी तळांवर प्रतिहल्ले केल्याने हा वाद आणखी पेटला आहे. या हल्ल्यानंतर भारतीय विमान कंपन्यांसह जगभरातील कंपन्यांनी पश्चिम आशियातील विमानसेवा स्थगित केली आहे.या परिस्थितीत दुबईची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत,ज्यामुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले होते. त्यात काही सेलिब्रिटींचीही नावे समोर आली. अशातच बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता देखील या युद्धजन्य परिस्थितीत दुबईत अडकली आहे. तिनं इन्स्टाग्रामवर याबाबत व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे.

लारा दत्ताने व्हिडिओमध्ये सांगितलं की ती आणि तिची मुलगी सायरा दुबईमध्ये आहेत,तर तिचा पती महेश भूपती कामानिमित्त दुसऱ्या ठिकाणी आहे.दरम्यान, आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्रीने म्हटलंय,"इस्रायल आणि इराणमधील परिस्थिती सुरू झाल्यापासून आम्ही दुबईत आहोत. लारा म्हणाली की,२८ फेब्रुवारी रोजी ती दुबईतील एका स्टुडिओमध्ये शूटिंग करत होती तेव्हा अचानक वरून मोठे स्फोट होऊ लागले.आम्ही सर्वजण घाबरून स्टुडिओबाहेर पळत सुटलो आणि आकाशात क्षेपणास्त्रे उडताना पाहिली."

यानंतर लारा लारा दत्ता यूएई सरकारचे कौतुक करत म्हणाली, "येथील सरकारने खूप छान काम करत  आहे. आमची काळजी घेतली गेली.आम्हाला इथं सुरक्षित वाटत आहे. आम्ही कुठले नागरिक आहोत याचा विचार न करता इथं आमची काळजी घेतली जात आहे. आम्हाला असं वाटत आहे की आम्हीही इथं तितकेच महत्त्वाचे आहोत आणि युएई इथं असणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेला तितकंच प्राधान्य देत आहे."

या व्हिडीओमध्ये लारा दत्ता असंही म्हणाली, की ती भारतात परतण्यासाठी विमान शोधत आहे, पण तिला कोणतीही विमान सेवा मिळत नाहीये. तिने पुढे सांगितलं की सध्याच्या परिस्थितीमुळे मुले थोडी घाबरली आहेत, म्हणून ते लवकरात लवकर भारतात परतण्याचा प्रयत्न करत आहेत.ती म्हणाली, "मी भारावले आहे, इथं डिलिव्हरी रायडर काम करत आहेत. अन्नपाणी मागवता येत आहे, मला त्या सर्वांप्रती प्रचंड आदराची भावना आहे ज्यांच्याकडे या परिस्थितीतही घराबाहेर पडण्यावाचून कोणताही पर्याय नाही, त्या लोकांविषयी मला प्रचंड आदर वाटतोय जे हा देश चालवत आहेत. आपण यातून मार्ग काढू. ज्याप्रमाणे भारत-पाकिस्तान तणावादरम्यान आपल्या देशाने आपल्याला सुरक्षित ठेवले, त्याचप्रमाणे येथील व्यवस्थाही चांगली आहे." यावेळी बोलताना अभिनेत्रीच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले.अभिनेत्रीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Lara Dutta stuck in Dubai amid Iran-Israel war, gets emotional.

Web Summary : Lara Dutta, along with her daughter, is stuck in Dubai due to the Iran-Israel conflict. She shared her experience of witnessing explosions during a shoot and praised the UAE government for ensuring their safety. Dutta is trying to find a flight back to India, expressing concern for children and respect for essential workers.
टॅग्स :लारा दत्ताइराणइस्रायलदुबईबॉलिवूडसेलिब्रिटी