Join us

घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राची एक्स जाऊबाई पडली पुन्हा प्रेमात; कोण आहे सोफी टर्नरचा राजकुमार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2023 14:57 IST

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नरच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा आहे.  

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस आणि ‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नर गेल्या अनेक दिवसांपासून घटस्फोटांमुळे चर्चेत आहे. दोघांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी न्यायालयात विभक्त होण्यासाठी अर्ज केला आहे. जो जोनसपासून वेगळं झाल्यानंतर आता सोफी टर्नरच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा आहे.  दोघांचे काही रोमँटिक फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र हा मिस्ट्री मॅन कोण आहे, हे माहीत आहे का ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये सार्वजनिक ठिकाणी सोफी टर्नर ही पेरेग्रीन पियर्सन या व्यक्तीला किस करताना दिसत आहे.  रिपोर्टच्या वृत्तानुसार, पिअर्सन आणि सोफी एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. पिअर्सन हा टॉप बिझनेस फॅमिलीमधून आहे. अलीकडेच ग्रीस आणि डेन्मार्कची राजकुमारी मारिया-ऑलिंपियासोबत त्याचं ब्रेकअप झालं होतं.

सोफी आणि पियर्सनच्या या फोटोंनी इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. फोटोंमध्ये दोघांमध्ये खास बाँन्डिंग असल्याचे ठळकपणे दिसून येत आहे. याआधी पीअरसन आणि सोफी नोव्हेंबर महिन्यात पॅरिसमध्ये एकत्र स्पॉट झाले होते. 

सोफी टर्नर आणि जो जोनस हे २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१७ मध्ये साखरपुडा केला. तर, २०१९ मध्ये लग्न केलं. लग्नगाठ बांधून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. परंतु, लग्नाच्या चार वर्षांनंतर दोघांच्याही नात्यात दुरावा आला. जो आणि सोफी यांनी २०२० मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले होते, तर २०२२ मध्ये त्यांनी दुसऱ्या मुलीला जन्म दिला होता.

टॅग्स :प्रियंका चोप्राहॉलिवूडसेलिब्रिटी