Alia Bhatt Cannes Debut: ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अखेर आलिया भटनेही (Alia Bhatt) यंदा पदार्पण केलं. आलिया यावेळी कान्सला जाणार की नाही अशा चर्चा होत्या. मात्र समारोहाच्या शेवटच्या दोन दिवशी तिने आपल्या फॅशनचा जलवा दाखवला. आलिया भट आपल्या फॅशन सेन्समुळे चाहत्यांना कधीच निराश करत नाही. तिचा कान्स डेब्यूही दमदार झालेला दिसत आहे. आपल्या दोन्ही लूकमधून आलियाने लक्ष वेधून घेतलं आहे.
आलिया भटने कान्स रेड कार्पेटसाठी व्हिंटेज लूक निवडला. आयव्हरी न्यूड फ्लोरल रफल ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला आहे. इटालियन डिझायनर Schilaparelli ने हा डिझाईन केला आहे. या ड्रेसमध्ये तिने रेड कार्पेट वॉक केला. यात ती अतिशय सुंदर दिसत होती. या ड्रेसवर तिने अगीद साधा नो ज्वेलरी लूक केला होता. आलियाने केवळ छोटे पर्ल इयररिंग्स परिधान केले होते. तर बोटात एक अंगठी होती. तिने गळ्यात किंवा हातात काहीही घातले नाही. तसंच तिचे केसही पूर्ण बांधलेले होते. आलियाच्या सिंपल पण एलिगंट लूकने चाहत्यांना प्रेमात पाडलं आहे.
तर कान्स रेड कार्पेटवरील दुसऱ्या लूकसाठी आलियाने निळा गाऊन परिधान केला होता. जेम स्टडेड अरमानी प्रिवी गाऊनमध्ये ती जणू परीच दिसत होती. गाऊनच्या वरच्या भागात जेमस्टोन लावलेले दिसत आहेत. तसंच बाकी भागही छोट्या छोट्या चमकदार स्टोन्सने सजवलेला दिसत आहे. यासोबत तिने हेडपीस घातला आहे. मॅचिंग ब्लू स्टोन इयररिंग्स घातले आहेत. यावर तिने न्यू मेकअप कॅरी केला होता. ना कोणती बोल्ड लिपस्टिक होती ना हाय कलर टोन केला होता.
आलिया भटने यंदा कान्ससाठी या दोन्ही स्पेशल लूकमधून सर्वांचं मन जिंकलं. अनेकांनी तिच्या दोन्ही लूक्सला पसंती दिली. 'बेस्ट डेब्यू','जास्त मेहनत न घेताही ती किती सुंदर दिसू शकते' अशा कमेंट्स तिच्या पोस्टवर आल्या आहेत.