Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया, रोहित शर्मा ते Jr NTR दिसणार कपिल शर्माच्या शोमध्ये, नवा प्रोमो प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 11:21 IST

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. 

लोकप्रिय कॉमेडियन 'कपिल शर्मा' (Kapil Sharma) हा नेहमीच चर्चेत राहतो. त्याचा या कॉमेडी शोचे लाखो चाहते आहेत. कपिल शर्माच्या शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीज हे त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तेथे येतात. फक्त कलाकारच नाही तर बिझनेसमॅनपासून क्रिकेटरपर्यंत अनेक दिग्गज सहभागी होतात. आता 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सीझनचा नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसऱ्या सीझनमध्ये सभागी होणाऱ्या पाहुण्याची झलक प्रोमोमध्ये पाहायला मिळतेय. नेटफ्लिक्सच्या युट्यूब चॅनलवर प्रोमो टाकण्यात आला आहे. तर दुसऱ्या सीझनमध्ये जिगरा सिनमाची स्टारकास्ट हजेरी लावणार आहे. याशिवाय, कपिलच्या शोमध्ये जान्हवी कपूर, Jr NTR आणि सैफ अली खान हे आपल्या 'देवरा' सिनेमाचं प्रमोशन करताना पाहायला मिळतील. 

एवढंच नाही तर रोहित शर्मा आणि सुर्या हे 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या मंचावर विनोदाचे चौकार अन् षटकार मारताना दिसून येणार आहेत. याशिवाय बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची पत्नी गौरी खानदेखील तिच्या मैत्रिणी अर्थात अभिनेता चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे,  अभिनेत्री नीलम कोठारी, महिप कपूर, शालिनी पासी, कल्याणी साहा चावला या कपिलसोबत इंडस्ट्रीमधील काही गॉपिस शेअर करताना पाहायला मिळतील.  'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रत्येक एपिसोड 21 सप्टेंबरपासून फक्त शनिवारी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.  

'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनमध्ये कपिलसोबत कृष्णा अभिषेक, सुनील ग्रोवर, किकू शारदा, अर्चना पूरण सिंह आणि राजीव ठाकूर हे देखील आहेत.  'द ग्रेट इंडियन कपिल शो चा पहिला सिझन हा १३ एपिसोडनंतर संपला होता. पहिल्या सीझनचे सर्व एपिसोड नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. 

टॅग्स :कपिल शर्मा रोहित शर्माआलिया भटज्युनिअर एनटीआर