Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणौतच्या टीकेला आलिया भटने दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 10:15 IST

गली बॉय मधील भूमिकेचे कौतुक करण्यासारखे त्यात काहीही खास नाहीये असे मत कंगना राणौतने नुकतेच व्यक्त केले होते. यावर आलिया भट काय म्हणतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

ठळक मुद्देमला कंगनाचा अभिनय खूप आवडतो. तिच्या मताचा मी आदर करते. तिचे अशाप्रकारचे मत असेल तर नक्कीच त्या मागे काही कारण असेल. मला केवळ माझ्या कामावर लक्ष द्यायचे आहे

आलिया भटच्या गली बॉय या चित्रपटातील परफॉर्मन्स प्रेक्षकांना आणि समीक्षकांना चांगलाच आवडला. तिच्या या भूमिकेचे सगळेच कौतुक करत आहेत. पण या भूमिकेचे कौतुक करण्यासारखे त्यात काहीही खास नाहीये असे मत कंगना राणौतने नुकतेच व्यक्त केले होते. यावर आलिया भट काय म्हणतेय याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

कंगनाच्या या वक्तव्याबाबत नुकतेच आलियाला मीडियाने विचारले असता ती म्हणाली, मला कंगनाचा अभिनय खूप आवडतो. तिच्या मताचा मी आदर करते. तिचे अशाप्रकारचे मत असेल तर नक्कीच त्या मागे काही कारण असेल. मला केवळ माझ्या कामावर लक्ष द्यायचे आहे आणि कंगनाने राझी या चित्रपटातील माझ्या भूमिकेची प्रशंसा केली होती. मी अधिक मेहनत घेऊन चांगले काम केले तर नक्कीच पुन्हा ती माझे कौतुक करेल.

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरू असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. एका संकेतस्थळाने घेतलेल्या ऑनलाईन पोलनंतर हा वाद सुरू झाला. या पोलमध्ये २०१९ च्या सर्वोत्कृष्ट नायिकेच्या स्पर्धेत कंगनाने आलियावर मात केली. लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर कंगना पहिल्या नंबरवर राहिली तर आलिया दुस-या क्रमांकावर आली. या पोलचा निकाल पाहून कंगनाला चेव चढला आणि ती आलियावर बिथरली होती.

 

‘आलियासोबत माझी तुलना होणे ही माझ्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. ‘गली बॉय’च्या तिच्या अभिनयात मला हरवण्यासारखे असे काय होते? पुन्हा एकदा तशीच फटकळ मुलीची भूमिका. मीडियाने ‘फिल्मी’ मुलांना त्यांच्या सुमार कामासाठी अति डोक्यावर घेतलेय. कृपया हे बंद करा. हेच सुरू राहिले तर दर्जेदार अभिनयाचा दर्जा कधीच सुधारणार नाही,’असे कंगना या पोलवर प्रतिक्रिया देताना म्हणाली होती. 

यापूर्वी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आलिया आणि रणबीर यांना युवा पिढीचा चेहरा म्हटले जात असल्यावर टीका केली होती. त्यांना युवा म्हणण्यात काय अर्थ आहे. रणबीर ३७ वर्षांचा आहे. आलिया २७ वर्षांची आहे. २७ व्या वयात माझी आई तीन मुलांची आई होती. त्याआधी ‘मणिकर्णिका’ला बॉलिवूडचा पाठिंबा न मिळाल्याने कंगना संतापली होती आणि आलियावर तिने सर्वाधिक संताप व्यक्त केला होता. आलिया संधीसाधू आहे, करण जोहरच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे, असे कंगना म्हणाली होती.

टॅग्स :कंगना राणौतआलिया भटगली ब्वॉय