Alia Bhatt London Vacation: अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहे. ती तिच्या अभिनयाने आणि अदांनी प्रेक्षकांना घायाळ करत आली आहे. तिच्या कामाबरोबरच ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत आलिया सध्या लंडनमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. याची एक झलक तिनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
आलियानं नुकतंच तिच्या लंडन ट्रीपमधील एक खास रील इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या रीलमध्ये आलिया कॅज्युअल आणि कूल लूकमध्ये दिसतेय. या व्हिडिओमध्ये ती लंडनमधील वेगवेगळ्या ठिकाणी दिसत आहे. प्रत्येक ठिकाणी रणबीर कपूर तिचा हात धरून तिला फिरवतोय. या व्हिडीओवर काही तासांतच हजारो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. फॅन्ससोबतच बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनीही तिच्या या रीलवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आलियाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती YRF पिक्चरसोबत आगामी 'अल्फा' सिनेमासाठी काम करत आहे. हा सिनेमा डिसेंबर २०२५ मध्ये भेटीला येण्याची शक्यता असून यात आलियासोबत शर्वरी वाघ झळकणार आहे. आलियाने तिच्या कारकिर्दीत आतापर्यंत २४ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. यापैकी फक्त काही चित्रपट फ्लॉप झाले असून १९ पेक्षा जास्त चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरलेत.