Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनयात नाही तर राहाने 'या' क्षेत्रात करिअर करावं! आलिया भटने व्यक्त केली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 12:58 IST

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आलियाने राहाच्या भविष्याबद्दल तिची एक खास इच्छा व्यक्त केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणिरणबीर कपूर यांची मुलगी राहा कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. राहाच्या जन्मानंतर आलिया अनेकदा आईपणावर भाष्य करताना दिसते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने राहाच्या भविष्याबद्दल तिची एक खास इच्छा व्यक्त केली आहे. आलियाला वाटते की, राहाने भविष्यात तिचे करिअर अभिनेत्री म्हणून नाही तर खेळाच्या मैदानात घडवावे.

राहाने 'अ‍ॅथलीट' बनावे अशी इच्छा

फेमिनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आलियाला विचारण्यात आले की, राहाने भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअर करावं असं तिला वाटतं? यावर उत्तर देताना आलिया म्हणाली, "मला खरंच वाटतं की राहाने भविष्यात एक 'अ‍ॅथलीट' बनावे. जेव्हा मी तिच्याकडे पाहते, तेव्हा मला तिच्यात एक वेगळीच ऊर्जा दिसते. ती फक्त तीन वर्षांची आहे तरी तिच्यात प्रचंड चपळाई आहे. एक टीम जेव्हा एकत्र होऊन काम करते तेव्हा मला खूप आनंद होतो" आलियाने स्पष्ट केले की, हे तिचे वैयक्तिक मत आहे आणि भविष्यात राहा जो काही निर्णय घेईल, त्याला तिचा पूर्ण पाठिंबा असेल.''आई झाल्यानंतर विचारांमध्ये खूप बदल आला आहे. याशिवाय इंडस्ट्रीत ज्या काही गोष्टी करण्याची इच्छा आहे, स्वप्न आहेत त्या सर्व गोष्टींचा आई होण्याशी काही संबंध नाही. अर्थात आई झाल्याने आयुष्याचे प्राधान्यक्रम बदलले आहेत.''; अशा भावना आलियाने व्यक्त केल्या. अशाप्रकारे आलियाने तिची लेक राहाबद्दल तिच्या भावना व्यक्त केल्या. आता राहा मोठी होऊन सिनेसृष्टीत येणार की करिअरचा वेगळा मार्ग निवडणार, हे काही वर्षांनी स्पष्ट होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Alia Bhatt hopes daughter Raha chooses sports career over acting.

Web Summary : Alia Bhatt envisions her daughter Raha becoming an athlete, noticing her energy and agility. While expressing this personal wish, she emphasizes supporting Raha's future choices, reflecting how motherhood has shifted her priorities.
टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरबॉलिवूड