Join us
Daily Top 2Weekly Top 5

जणू दुसरी रेखा! 'उमराव जान'च्या प्रीमियरला आलिया भटने केला 'सिलसिला' लूक, चाहत्यांनी दिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 12:09 IST

आलिया भटने उमराव जान सिनेमाच्या प्रीमियरला रेखा यांच्यासारखाच खास लूक परिधान केला आहे. त्यामुळे सर्वांनी आलियावर प्रेम दर्शवलं आहे

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे रेखा. सध्या रेखा एका खास गोष्टीमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. रेखा यांचा गाजलेला 'उमराव जान' सिनेमा री-रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने रेखा यांनी इंडस्ट्रीतील जवळचे मित्र-मैत्रीण आणि नातेवाईकांसाठी एक खास प्रीमियर आयोजीत केला होता. त्यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटने रेखा यांनी 'सिलसिला' सिनेमात जी साडी परिधान केली होती, तसाच लूक कॅरी करुन सर्वांचं लक्ष वेधलं. "जणू दुसरी रेखा", असंच आलियाला पाहून सर्वजण म्हणत होते. 

आलिया झाली हुबेहुब रेखा

आलिया भटची स्टायलिस्ट रिया कपूर यांनी अभिनेत्रीचे हे फोटो इंन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. 'उमराव जान' सिनेमाच्या  प्रीमियरला रेखा यांच्याप्रती आदर दर्शवण्यासाठी आलियाने त्यांचाच जुना लूक परिधान केला. बेबी पिंक रंगाची साडी, कानातले खास झुमके असा पोशाख परिधान करुन आलियाने 'उमराव जान'च्या प्रीमियरला खऱ्या अर्थाने लाइमलाइट लुटली. रेखा यांनी 'सिलसिला' सिनेमात अशीच साडी परिधान केली होती. या सिनेमात रेखा यांच्यासह अमिताभ बच्चन आणि जया बच्चन सुद्धा झळकले होते. आलियाचा हा लूक बघून सर्वांना 'सिलसिला' सिनेमातील रेखा यांच्या लूकची आठवण आली.

कधी रिलीज होणार 'उमराव जान'

दरम्यान आज शुक्रवारी २७ जून रोजी 'उमराव जान' सिनेमा पुन्हा रिलीज झाला आहे. या सिनेमात दिवंगत अभिनेते फारुक शेख आणि अभिनेत्री रेखा हे दोघे प्रमुख भूमिकेत होते. त्यांच्यासह राज बब्बर, नसीरुद्दीन शाह हे कलाकार झळकले होते. बॉलिवूडमधील एक अजरामर क्लासिक सिनेमा म्हणून 'उमराव जान' मानला जातो. सिनेमातील गाणी आणि कलाकारांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या सिनेमाच्या  प्रीमियरला आलियाने रेखा यांच्यासारखाच लूक करुन ज्येष्ठ अभिनेत्रीप्रती आदर्श आणि प्रेम दर्शवलं.

टॅग्स :आलिया भटरेखाबॉलिवूड