नव्या पिढीतील सर्वाधिक लोकप्रिय बॉलिवूड स्टार्स टायगर श्रॉफ व आलिया भट्ट लवकरच एकत्र दिसणार आहेत. पण थांबा... कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी पुढची बातमी वाचा. आलिया व टायगर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसतील, पण कुण्या चित्रपटात नव्हे तर एका स्पेशल गाण्यात. होय, ‘स्टुडंट ऑफ द ईअर 2’ या चित्रपटातील एका खास गाण्यात आलिया व टायगर एकत्र दिसणार आहेत. पुढील आठवड्यात दोघेही या गाण्याचे शूट पूर्ण करतील. फराह खान हे गाणे कोरिओग्राफ करणार आहे.
तुम्हाला ठाऊक असेलचं की ‘स्टुडंट ऑफ द ईअर2’ हा ‘स्टुडंट ऑफ द ईअर’चा सीक्वल आहे. ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला होता. हा आलियाचा पहिला चित्रपट होता. त्यामुळे तिच्या डेब्यू चित्रपटाचा सीक्वल येतोय म्हटल्यावर आलिया खूश आहेच. पण आता सीक्वलमध्येही कॅमिओ करणार म्हटल्यावर आलियाचा आनंद द्विगुणित झाला आहे.