'धुरंधर' सिनेमातील Fa9la हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याचे शब्द आपल्याला कळत नसले तरी ऐकायला मजा येते. पण या बहरीन गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ नेमका काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात असेल. अखेर याचा उलगडा झाला आहे. या गाण्याचे मूळ शब्द आणि त्यामागचा अर्थ भन्नाट आहे. जाणून घ्याFa9la गाण्याचे शब्द आणि अर्थएका वेबसाईटने Fa9la गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ सांगितला आहे. जो वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. या गाण्याचे मूळ शब्द पुढीलप्रमाणे:- याखी दूस दूस इंदी खोश फासला, याखी तफूज तफूज वल्लाह खोश रकसा, इंदी लक रकसा कविया या अल-हबीब, इस्महा सबूहा खतभा नसीब मिद यदक जिन्क ब्तातिहा कफ, वा हेज जितफिक ईल खल्लिक शदीद.
या गाण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे:- मित्रा, जोरात नाच, आज मी भरपूर मस्ती करायच्या मूडमध्ये आहे... मित्रा, सर्व सोड, तुला देवाची शपथ, चल एक मस्त डान्स करु... मित्रा, तुझ्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त डान्स स्टेप आहे... त्याचं नाव सबूहा आहे, नशीबाने हे तुझ्यासाठीच लिहिलं आहे... तुझा हात वर कर आणि ताल धर... तुझ्या खांद्यांना जोरात हलव आणि तुझ्यातली एनर्जी अशीच राहूदे...
Web Summary : Akshay Khanna's dance on 'Fa9la' from 'Dhurandhar' is viral. The song, by rapper Flipperachi, encourages joyful dancing. The lyrics translate to urging a friend to dance freely and enthusiastically, promising a great time. Its catchy tune has made it popular.
Web Summary : 'धुरंधर' के गाने 'Fa9la' पर अक्षय खन्ना का डांस वायरल है। रैपर फ्लिपरची का गाना खुशी से नाचने के लिए प्रोत्साहित करता है। गाने के बोल एक दोस्त को खुलकर और उत्साह से नाचने के लिए कहते हैं, एक शानदार समय का वादा करते हैं। इसकी धुन इसे लोकप्रिय बनाती है।