Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रेक्षकांना धक्का! 'दृश्यम-३' नंतर अक्षय खन्नाने गमावला 'हा' बिग बजेट सिनेमा? मोठी अपडेट समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 11:02 IST

'दृश्यम-३' नंतर अक्षय खन्नाने गमावला 'हा' बिग बजेट सिनेमा? निर्मात्यांना सांगितलं खरं कारण 

Akshaye Khanna: आदित्य धर लिखित, दिग्दर्शित 'धुरंधर' या चित्रपटाची क्रेझ अजूनही चाहत्यांमध्ये कायम आहे. या चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारून अभिनेता अक्षय खन्ना चांगलाच प्रसिद्धीझोतात आला.या चित्रपटात खलनायक साकारुनही तो चांगलाच भाव खाऊन गेला. त्यामुळे धुरंधरच्या यशानंतर अक्षय खन्नाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अलिकडेच अक्षय खन्ना 'दृश्यम-३' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आला होता. काही कारणास्तव त्याने या प्रोजेक्टमधून माघार घेतली.'दृश्यम-३' मधून एक्झिट घेतल्यानंतर आता अक्षय खन्नाबद्दल आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

'दृश्यम-३' नंतर अक्षय खन्नाने आणखी एक बिग बजेट सिनेमात दिसणार नसल्याची माहिती मिळते आहे. बॉलिवूडमध्ये 'रेस' फ्रॅचायझीचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या  फ्रॅचायझीचे पहिले तीन भाग प्रचंड हिट झाले. त्यानंतर आता लवकरच या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय खन्नाने दमदार अभिनय केला होता. सध्या 'रेस ४' च्या स्क्रिप्टवर काम सुरू आहे आणि या चौथ्या भागातही सैफ अली खान आणि अक्षय खन्ना दिसतील अशा चर्चा होत्या. आता या चर्चांवर निर्माते रमेश तौरानी यांनी भाष्य केलं आहे. 'एचटी सिटी'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले, "आम्ही अक्षय खन्नाशी संपर्क साधला नाही. कारण त्याच्या भूमिकेला पुढे काही वाव नाही." 

दरम्यान, चित्रपटात मुळ कथेत बदल करून अक्षय खन्नाला कास्ट करण्यात येईल, असे अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले होते. या चर्चांना आता रमेश तौरानी यांनी पूर्णविराम दिला आहे. ते म्हणाले, "चित्रपटातील त्याच्या कास्टिंगबद्दल सध्या तरी कोणताही विचार नाही. कारण, पहिल्या भागात त्याचा एक कार अपघात होतो. ही कहाणी तिथेच संपते." असा खुलासा त्यांनी यावेळी मुलाखतीत केला आहे. याचदरम्यान, रमेश तौरानी यांनी 'रेस ४' बद्दलही एक अपडेट दिली आहे. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि सैफ अली खान यांना चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे का, असे विचारले असता, त्यावर उत्तर देत ते म्हणाले-" आम्ही अद्याप कलाकारांची नावे निश्चित केलेली नाही, सध्या कथेवर काम सुरू आहे."

'रेस' फ्रँचायझीचे आतापर्यंत तीन भाग आले आहेत.  'रेस' चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता, ज्यात सैफ अली खान आणि अक्षय खन्ना यांच्यासोबत कतरिना कैफ आणि बिपाशा बसू यांनी काम केलं होतं. लवकरच या चित्रपटाचा चौथा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Khanna Loses Big Budget Film After 'Drishyam 3' Exit?

Web Summary : After exiting 'Drishyam 3,' Akshay Khanna reportedly lost 'Race 4' due to script limitations. Producer Ramesh Taurani clarified Khanna's character's story concluded in the first film. Casting for 'Race 4' is ongoing.
टॅग्स :अक्षय खन्नाबॉलिवूडसिनेमा