Dhurandhar Box Office Collection Day 14: गेल्या काही दिवसांपूर्वी 'धुरंधर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची सगळीकडे चर्चा सुरू आहे. गेल्या दोन आठवड्यात जिओ स्टुडिओजची निर्मिती असलेल्या आणि आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. दरदिवशी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरील विक्रम मोडून जबरदस्त कमाई करताना दिसला. पण, आता चौदाव्या दिवशी या चित्रपटानं किती कोटी कमावले हे जाणून घेऊया.
'धुरंधर'नं १४ दिवसांत ४७९.५० कोटी रुपयांचा वाढव्य आकडा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१८ कोटींची दणदणीत कमाई केली होती. त्यानंदर'धुरंधर'ने दुसऱ्या आठवड्यात 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत ठेवली. दुसऱ्या शुक्रवारी ३४.७० कोटी, शनिवारी ५३.७० कोटी आणि रविवारी ५८.२० कोटी रुपयांची दणदणीत कमाई करत दुसऱ्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला.
विकेंड संपल्यानंतरही प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी झाला नाही. दुसऱ्या सोमवारी चित्रपटाने ३१.८० कोटी आणि मंगळवारी ३२.१० कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर बुधवारी २५.७० कोटी आणि गुरुवारी २५.३० कोटी रुपयांची भर पडल्याने १४ दिवसांनंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४७९.५० कोटी झाले आहे. आता हा चित्रपट लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे.
'अवतार ३' सोबत मोठी टक्कर
'धुरंधर' चित्रपटाने गेल्या १४ दिवसांत बॉक्स ऑफिसवर जे वादळ निर्माण केलं, त्याला आता खऱ्या अर्थाने एक आव्हान मिळणार असल्याचं दिसतंय. कारण, आज, १९ डिसेंबर रोजी जेम्स कॅमेरॉन यांचा जगप्रसिद्ध 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे 'धुरंधर' आणि 'अवतार: फायर अँड ॲश' यांच्यात बॉक्स ऑफिसवर टक्कर होईल. या तगड्या स्पर्धेत 'धुरंधर' तग धरून ठेवतो की नाही, हे पाहणं रंजक ठरेल.