'धुरंधर' सिनेमाच्या तुफान यशाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाने ६०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमात अक्षय खन्नाची तर चांगलीच हवा होत आहे. त्याचा स्वॅग, स्टाईल, डान्स तुफान व्हायरल होत आहे. यावर्षी अक्षय खन्नाने 'छावा' आणि 'धुरंधर; या सिनेमांमधून छाप पाडली. त्याआधी २०२२ साली अक्षय खन्ना 'दृश्यम २'मध्येही भाव खाऊन गेला होता. आता 'दृश्यम ३'चं शूट लवकरच सुरु होणार आहे. मात्र या सिनेमातून अक्षय खन्ना बाहेर पडल्याची चर्चा आहे.
२०२२ साली आलेल्या 'दृश्यम २'मध्ये अक्षय खन्ना पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत होता. त्यात त्याचा अॅटिट्यूड अजय देवगणवरही भारी पडला होता. त्यानंतर अक्षयने 'छावा' आणि 'धुरंधर'मधून प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. सध्या सिनेमांमध्ये त्यालाच घेण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, अक्षयनेही आता मानधनात वाढ केली आहे. लवकरच 'दृश्यम ३'चं शूट सुरु होणार असताना अक्षय खन्ना मात्र सिनेमातून बाहेर पडला आहे. सिनेमाचे मेकर्स आणि अक्षय यांच्यात काही मतभेद झाले जे दूर होऊ शकलेले नाहीत. यामागे मानधनाचंच कारण असल्याची चर्चा आहे. अद्याप मेकर्सने यावर अधिकृत कन्फर्मेशन दिलेलं नाही. मात्र हे खरं असेल तर 'दृश्यम ३'मध्ये अजय देवगण आणि अक्षय खन्ना आमने सामने येणार नाही यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली आहे.
अक्षय खन्नाकडे सध्या सिनेमांच्या ऑफर्सची रांग आहे. नुकताच तो 'धुरंधर' सिनेमात दिसला. यामध्ये त्याने रहमान डकैतची भूमिका केली. आज सगळीकडे त्याच्या डान्सचे रील्स व्हायरल होत आहेत. तो आगामी 'बॉर्डर २' मध्येही त्याचा कॅमिओ असल्याची चर्चा आहे. त्याच्याकडे आणखी ५ चित्रपट आहेत जे पुढील वर्षी रिलीज होणार आहेत.
Web Summary : Akshaye Khanna, fresh from 'Dhurandhar's' success, may not be in 'Drishyam 3'. Salary disagreements are rumored to be the cause, disappointing fans hoping for Khanna versus Devgn.
Web Summary : 'धुरंधर' की सफलता के बाद, अक्षय खन्ना 'दृश्यम 3' में शायद नहीं होंगे। वेतन विवादों की अफवाह है, जिससे खन्ना बनाम देवगन की उम्मीद कर रहे प्रशंसक निराश हैं।