Akshay Kumar refuses to go on Kapil Sharma’s show: सिनेमा रिलीज होणार म्हटलं की, बडे बडे बॉलिवूड स्टार्स कॉमेडियन कपिल शर्माच्या (Kapil Sharma) ‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रमोशनसाठी हजेरी लावतात. अक्षय कुमार (Akshay Kumar) तर अगदी ठरलेला. पण आता अक्कीने म्हणे ‘बच्चन पांडे’च्या (Bachchan Pandey) प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये (The Kapil Sharma Show) जाण्यास नकार दिला आहे. होय, चर्चा तर हीच आहे. अक्षय कुमार कपिल व त्याच्या टीमवर नाराज असल्याचं कळतंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेली एक क्लिप या नाराजीचं कारण ठरल्याचीही चर्चा आहे.हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय व कपिल यांचं सध्या काहीतरी बिनसलं आहे. अक्षय म्हणे कपिलवर नाराज आहे. आता या नाराजीचं सविस्तर कारण काय तर एक क्लिप.
‘बच्चन पांडे’ या चित्रपटांशिवाय येत्या काळात अक्षयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. यात रामसेतू, रक्षाबंधन, पृथ्वीराज, सेल्फी और सिंड्रेला अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.