Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारला एका मुलीनं या कारणामुळे केलं होतं रिजेक्ट, कपिल शर्माच्या शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 19:16 IST

कॉमेडीयन कपिल शर्माचा लोकप्रिय शो द कपिल शर्मामध्ये नुकतेच 'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती.

कॉमेडीयन कपिल शर्माचा लोकप्रिय शो द कपिल शर्मामध्ये नुकतेच 'हाऊसफुल ४' चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमार, चंकी पांडे, क्रिती सनॉन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, बॉबी देओल आणि रितेश देशमुख यांनी हजेरी लावली होती. यावेळी सर्व कलाकारांनी कपिल शर्मासोबत शोमध्ये धमाल केली. मात्र अक्षय कुमारच्या एका गोष्टीमुळे खूप धमाल उडाली. 

कपिल शर्मा शोमध्ये अक्षय कुमारने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, ‘सुरुवातीला मला अनेक मुलींनी नाकारले होते. तसेच माझ्यासोबत डेटवर येण्यासही नकार दिला होता. त्यानंतर अक्षयने मुली त्याला नकार का द्यायच्या याचे कारणदेखील सांगितले. 

तो म्हणाला की, लहानपणापासून मी खूप लाजाळू होतो. मी एका मुलीला डेट करत होतो. तिला घेऊन मी बऱ्याच वेळा फिरायला जात असे. पण त्या मुलीला माझा हात पकडून रोमॅन्टिक अंदाजात फिरायचे होते आणि हे करताना मला लाज वाटायची. त्यामुळे एक दिवस त्या मुलीने माझ्यासोबत डेटवर येण्यास नकार दिला. हे ऐकताच सगळे हसू लागले.

हाऊसफुल ४ चित्रपटात अक्षयसोबत रितेश देशमुख, कृति सेनॉन, पूजा हेगडे, क्रिती खरबंदा, राणा दग्गुबाती, चंकी पांडे, बोमण ईराणी, जॉनी लीवर व राजपाल यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. हाऊसफुल’ फ्रेन्चाइजीच्या या चौथ्या चित्रपटात कॉमेडी आणि पीरियड ड्रामा याचे भन्नाट मिश्रण पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला होता. यात 1419 आणि 2019 असे दोन काळ आपल्याला पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :अक्षय कुमारहाउसफुल 4द कपिल शर्मा शोकपिल शर्मा