Join us

२ कोटी अक्कीयन्स! अक्षय कुमारचे धम्माल सेलिब्रेशन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 22:54 IST

लवकरच अक्षयचा ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ‘गोल्ड’च्या रिलीजआधीचं अक्षयचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. 

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार म्हणजे तरूणाईच्या गळ्यातील ताईत.  बॉलिवूडच्या ‘खान’  मंडळींइतकाच अक्षयही तरुणाईत प्रचंड लोकप्रिय असलेला कलाकार आहे. लवकरच अक्षयचा ‘गोल्ड’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. पण ‘गोल्ड’च्या रिलीजआधीचं अक्षयचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे. होय, हे सेलिब्रेशन आहे, २ कोटी अक्कीयन्सचे... आता हे २ कोटी अक्कीयन्स काय प्रकरण आहे, हे तुम्हाला कळले नसेल तर खुद्द अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर त्याचा खुलासा केलाय. २ कोटी अक्कियन्स हे आहेत, अक्षयचे इन्स्टाग्राम फॉलोअर्स.

अक्षय कुमार सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याला फॉलो करणा-्यांची संख्या रोज वाढताना दिसतेय. मंगळवारी त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सचा हा आकडा २ कोटींवर पोहोचला. त्याचेच हे सेलिब्रेशन.तो ट्विटरवर लिहितो, ‘मी कशाचे सेलिब्रेशन करतोय याबद्दल तुम्ही आश्चर्यचकित झालात ना ? तुमच्याशी शेअर करताना आनंद होतोय की, इन्स्टाग्रामवर आता २ कोटी अक्कियन्सचे कुटुंब झाले आहे. हा मोठा पल्ला गाठल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार’.अक्षय कुमारचे आता इन्स्टाग्रामवर २ कोटी फॉलोअर्स झाले आहेत. त्याच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओदेखील अक्षयने शेअर केलाय.

टॅग्स :अक्षय कुमार