Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारने पाहिला 'धुरंधर'! 'प्रपोगंडा' विषयी अभिनेता स्पष्टच म्हणाला- "अशा चित्रपटांमध्ये..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:32 IST

'धुरंधर २' रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा प्रपोगंडा आहे असं बोललं जातंय. अखेर याविषयी विचारलं असता अभिनेता अक्षय कुमारने 'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी स्पष्ट मत मांडलं आहे.

रणवीर सिंगची भूमिका असलेल्या 'धुरंधर २' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमात रणवीर सिंगच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. पहिल्या भागात अक्षय खन्ना आणि इतर कलाकारांनीही दमदार भूमिका साकारल्या. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'धुरंधर २' रिलीज झाल्या झाल्या हा सिनेमा प्रपोगंडा आहे असं बोललं जातंय. अखेर याविषयी विचारलं असता अभिनेता अक्षय कुमारने 'धुरंधर' सिनेमात प्रपोगंडा आहे की नाही? याविषयी स्पष्ट मत मांडलं आहे.अक्षय कुमारने NBT ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल त्याचं मत व्यक्त केलंय. अक्षय म्हणाला, "मला नाही वाटत की या सिनेमात कोणताही प्रपोगंडा आहे. प्रपोगंडा चित्रपट म्हणजे नक्की काय? हे मला माहित नाही. चित्रपट एकतर चांगला असतो किंवा वाईट. हा 'प्रपोगंडा' शब्दच माझ्या समजण्यापलीकडचा आहे. मला वैयक्तिकरित्या 'धुरंधर' चित्रपट खूप आवडला. मी तो चित्रपट पाहिला आहे. लोक त्याला प्रपोगंडा चित्रपट म्हणत असले, तरी मला मात्र हा चित्रपट मनापासून आवडला आहे."

अक्षय पुढे असेही म्हणाला की, "जर मला कधी संधी मिळाली, तर अशा चित्रपटांमध्ये छोटी भूमिका साकारायलाही मी तयार आहे. कोणी काहीही म्हणो, पण 'धुरंधर' खरोखरच एक उत्तम चित्रपट आहे.",  अशाप्रकारे अक्षय कुमारने 'धुरंधर' सिनेमा प्रपोगंडा आहे अशी जी चर्चा होतेय, त्यांची बोलती बंद केली आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो लवकरच भूत बंगला सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा १० एप्रिलला रिलीज होणार होता. मात्र, आता मेकर्स चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकळण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे हा चित्रपट १० एप्रिल ऐवजी १७ एप्रिल रोजी रिलीज केला जाणार असल्याचं कळतंय. याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Akshay Kumar Praises 'Dhurandhar', Dismisses Propaganda Claims, Ready for a Role.

Web Summary : Akshay Kumar praised 'Dhurandhar', dismissing propaganda claims, calling it a good film. He is open to roles in such films and mentioned his upcoming movie, 'Bhoot Bangla'.
टॅग्स :अक्षय कुमारधुरंधर सिनेमारणवीर सिंगबॉलिवूड