Join us

अक्षय कुमारला रातोरात मालामाल बनवणाऱ्या चित्रपटाचा सिक्वेल येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:57 IST

अक्षय कुमारच्या एका चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. ज्याने अक्षय कुमारला रातोरात मालामाल बनवले होते.

Singh Is Kinng 2 Sequel  : अक्षय कुमारचा 'सिंग इज किंग' (2008) हा बॉलीवूडमधील सर्वात आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. केवळ कॉमेडीच नाही, तर कतरिना कैफसोबत अक्षयची रोमँटिक केमिस्ट्रीही लोकांना पसंत पडली होती. आता याच सिनेमाचा सिक्वेल येणार असल्याची चर्चा आहे. 

'सिंग इज किंग 2'मध्ये अक्षय कुमार नाही तर अभिनेता रणवीर सिंग किंवा अभिनेता दिलजीत दोसांझ झळकणार असल्याचं बोललं जात होतं. पण, अक्षयच्या जागी इतर कोणालाही कास्ट करण्याआधी अक्षयची परवानगी घ्यावी लागणार आहे. कारण, 'सिंग इज किंग'चे 50 टक्के आयपी अधिकार अक्षय कुमारकडे आहेत. लवकरच या चित्रपटात मुख्य भूमिकेत कोण असणार याबाबत स्पष्टता येईल. 

अक्षयचा 'सिंग इज किंग' 2008 मध्ये सिंग इज किंग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.  हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाचे बजेट जवळपास 30 कोटी रुपये होते आणि चित्रपटाने जवळपास 130 कोटींची कमाई केली होती. परदेशातही या चित्रपटाचे चांगले कलेक्शन होते. आता चाहत्यांना 'सिंग इज किंग 2' ची प्रतिक्षा आहे.  

टॅग्स :अक्षय कुमार