Join us

"बाळाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही..." कतरिना आणि विकीच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारची खास प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 11:16 IST

कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या 'गुड न्यूज'वर अक्षय कुमारनं खास प्रतिक्रिया दिली.

Katrina Kaif Announced Pregnancy: गेल्या अनेक दिवसांपासून  अभिनेत्री कतरिना कैफच्या गरोदरपणाबद्दल चर्चा सुरू होत्या. अखेर काल मंगळवारी, कतरिना आणि तिचा पती विकी कौशल यांनी सोशल मीडियावरून ही आनंदाची बातमी शेअर केली. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये कतरिनाचा बेबी बंप दिसतोय. त्यानंतर सेलिब्रिटी आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेता अक्षय कुमारने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अक्षयने आपल्या खास विनोदी शैलीत विकी आणि कतरिनाला त्यांच्या होणाऱ्या मुलाला इंग्रजीसोबतच पंजाबी भाषाही शिकवण्याची विनंती केली. कतरिना आणि विकीच्या पोस्टवर कमेंट करताना अक्षय कुमारने लिहिले, "मी तुमच्या दोघांसाठी खूप आनंदी आहे. मी तुम्हाला चांगले ओळखतो आणि मला खात्री आहे की तुम्ही दोघेही सर्वोत्तम पालक व्हाल. तुमच्या मुलाला इंग्रजी आणि पंजाबी दोन्ही समान शिकवा. खूप प्रेम आणि आशीर्वाद. जय महादेव".

अक्षय आणि कतरिना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून, त्यांच्यात चांगली मैत्री आहे. त्यामुळे, अक्षयची ही खास आणि मजेशीर कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे. कतरिना आणि विकी यांचे लग्न ९ डिसेंबर २०२१ रोजी झाले होते. त्यांची पहिली भेट झोया अख्तरच्या एका पार्टीत झाली होती, त्यानंतर त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात झाली. आता हे जोडपे त्यांच्या आयुष्यात एका नव्या अध्यायाची सुरुवात करत आहेत.

अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'जॉली एलएलबी ३' मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेता अर्शद वारसीदेखील आहे.  'जॉली एलएलबी ३' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

टॅग्स :अक्षय कुमारकतरिना कैफविकी कौशल