अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आज बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या व्यावसायिक आयुष्याप्रमाणेच त्याचे वैयक्तिक आयुष्य आणि प्रेमसंबंधही नेहमीच चर्चेत राहिले आहे. अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले, पण रवीना टंडनसोबत त्याचे प्रेमसंबंध सर्वाधिक सीरियस मानली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अक्षय आणि रवीना यांनी गुपचूप साखरपुडाही केला होता. रवीनाने तर अक्षयसाठी आपले काम सोडून देण्याचा निर्णयही घेतला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि शेवटी त्यांचं ब्रेकअप झालं. त्यांचं ब्रेकअप ही त्यांच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी होती.
रवीना टंडननेअक्षय कुमारसोबतच्या साखरपुडा आणि नात्याबद्दल अनेक गोष्टी मोकळेपणाने सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत तिने म्हटले होते की, मी अशा व्यक्तीसोबत साखरपुडा केला होता, ज्याला मी ओळखत होते. आयुष्यात मला तेच हवं होतं. मी लग्नाआधीच काम सोडलं होतं, कारण आम्ही ठरवलं होतं की, ज्या दिवशी माझ्या शेवटच्या चित्रपटाचं शूटिंग संपेल, त्याच दिवशी आम्ही लग्न करू. जेव्हा मी पुन्हा काम सुरू केलं, तेव्हा त्याने पुन्हा काम सोडून देण्यास सांगितलं. पण मी त्याला स्पष्टपणे सांगितलं की, 'मी एकदा तुझ्यासाठी काम सोडलं होतं, पण यावेळी मी कामासाठी तुला सोडत आहे.
अक्षय कुमारवर फसवणुकीचा आरोपरवीना टंडनने अक्षय कुमारवर फसवणूक केल्याचा गंभीर आरोप केला होता. रवीनाने सांगितलं होतं की, ती नात्यात प्रामाणिक होती, पण अक्षय मात्र एकाच वेळी अनेक मुलींना डेट करत होता. त्याला बघून असं वाटायचं की मुंबईतील ७५ टक्के मुलींच्या पालकांना त्याला 'आई-वडील' म्हणावं लागेल." अक्षयसोबतच्या ब्रेकअपनंतर रवीना खूप दुःखी झाली होती आणि ती गाडी घेऊन दिवस-रात्र रस्त्यावर फिरत असे.
अक्षय आणि रवीना एकत्र केलेले चित्रपटअक्षय आणि रवीना यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यामध्ये 'मोहरा', 'खिलाड़ियों का खिलाड़ी', 'बारूद', 'कीमत', आणि 'पुलिस फोर्स: एन इनसाइड स्टोरी' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर आता हे दोघेही 'वेलकम टू द जंगल' या चित्रपटात पुन्हा एकत्र दिसणार आहेत. त्यांनी या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो लवकरच 'जॉली एलएलबी ३' मध्येही दिसणार आहे.