Join us

लॉकडाऊनमध्ये अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा रिलीज आधीच धमाका, कमावले 125 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 15:57 IST

लक्ष्मी बॉम्ब तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हा हिंदी रिमेक आहे.

सध्या भारतात लॉकडाऊन असल्याने चित्रपटगृहं गेल्या दोन महिन्यांहुन अधिककाळ बंद आहेत आणि कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत असल्याने चित्रपटगृह पुन्हा कधी सुरू होणार यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचे बिग बजेट चित्रपट चित्रपटगृहाऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जाणार असल्याचे म्हटले जात आहे. अक्षय कुमारचा बहुचर्चित लक्ष्मी बॉम्ब हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हॉटस्टारने लक्ष्मी बॉम्ब १२५ कोटींना खरेदी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून यासंदर्भात बातचित सुरु होती. लक्ष्मी बॉम्बच्या मेकर्सनी सिनेमाला डिजिटल प्लॉटफॉर्मवर शिफ्ट करण्याचे ठरविले आहे. 

लक्ष्मी बॉम्ब तमीळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुनी २: कंचना'चा हा हिंदी रिमेक आहे. अक्षय कुमारला बऱ्याच दिवसांपासून ‘कंचना’ची स्क्रिप्ट आवडली होती आणि त्यामुळे या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यासाठी त्याने होकार दिला होता.  या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहेत.. राघव लॉरेन्स या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  राघव यांनीच ‘कंचना’चे दिग्दर्शन केले होते.

टॅग्स :अक्षय कुमार