Join us

असं काय घडलं की 'बच्चन पांडे'च्या मेकर्सचा बदलला मूड, उत्तर प्रदेश शूट न करण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 17:08 IST

अक्षय कुमारचा अ‍ॅक्शन-कॉमेडी 'बच्चन पांडे' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे

अक्षय कुमार कोरोनानंतर पुन्हा कामावर परतला आहे. त्याचा अ‍ॅक्शन-कॉमेडी 'बच्चन पांडे' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाचे शूटिंग जानेवारीपासून जैसलमेरमध्ये सुरू आहे. निर्मात्यांना या  शहराने इतके प्रभावित झाले की त्यांनी शूटिंगचे वेळापत्रक बदलले.

पुढच्या वर्षी 26 जानेवारीला रिलीज होणार सिनेमारिपोर्टनुसार, सिनेमाचे बॅकड्रॉप उत्तर प्रदेशचे आहे पण निर्मात्यांना त्याचे शूट जैसलमेरमध्ये करायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार जयपूर शहरला उत्तर प्रदेश म्हणून सिनेमात दाखवण्यात येणार आहे. सिनेमाच्या शूटिंगला वर्षाच्या सुरूवातीला सुरुवात झाली.  26 जानेवारी 2022 च्या आसपास 'बच्चन पांडे' रिलीज होण्याची शक्यता आहे. 

या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अलीकडेच अक्षयने 'अतरंगी रे' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं. अक्षयसोबत या सिनेमात सारा अली खान आणि धनुष दिसणार आहे. तसेच बेल बॉटम', 'रक्षा बंधन', 'राम सेतु' सारख्या सिनेमातही अक्षय कुमार झळकणार आहे. 

टॅग्स :अक्षय कुमार