Join us

OMG! अक्षय कुमार या चित्रपटासाठी घेणार 100 कोटी फी??

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2019 09:45 IST

अक्षय कुमारच्या नावावर सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे. होय, एका चित्रपटासाठी अक्षय 100 कोटी फी घेणार असल्याची बातमी आहे.

ठळक मुद्देअक्षय व वासू भगनानी यांनी तीन वर्षांपूर्वी ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव टॉप अ‍ॅक्टरमध्ये घेतले जाते. जगातील सर्वांधिक कमाई करणा-या कलाकारांच्या यादीत अक्षय चौथ्या क्रमांकावर आहे. अक्षयची एकूण कमाई 486 कोटींच्या घरात आहेत. आता या कमाईत आणखी 100 कोटींची भर पडणार आहे. केवळ इतकेच नाही तर अक्षय कुमारच्या नावावर सर्वाधिक मानधन घेण्याचा विक्रम नोंदवला जाणार आहे. होय, एका चित्रपटासाठी अक्षय 100 कोटी फी घेणार असल्याची बातमी आहे.चर्चा खरी मानाल तर निर्माता वासू भगनानीसोबत अक्षय पुन्हा एकदा काम करू शकतो. या चित्रपटासाठी भगनानी यांनी अक्षयला 100 कोटींची डील दिल्याचे कळतेय. अक्षयच्या मॅनेजरने या डीलच्या रकमेबद्दल काहीही सांगण्यास नकार दिला. पण अक्षय व वासू भगनानी यांच्यात एका नव्या चित्रपटावर चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

वासू भगनानी आणि निर्माता-दिग्दर्शक निखील अडवाणी असे दोघे मिळून हा चित्रपट बनवणार आहेत. रंजीत तिवारी हा चित्रपट दिग्दर्शित करणार, असेही कळतेय. हा चित्रपट एक हार्ड कोर अ‍ॅक्शन ड्रामा असेल. लंडनमध्ये याचे बहुतांश शूटींग होईल. 

अक्षय व वासू भगनानी यांनी तीन वर्षांपूर्वी ‘एअरलिफ्ट’ या चित्रपटासाठी एकत्र काम केले होते. हा चित्रपट चांगलाच गाजला होता. वासू भगनानी यांनी कुली नंबर 1, हिरो नंबर 1, वीबी नंबर 1, शादी नंबर 1 याशिवय बडे मियां छोटे मियां, प्यार किया तो डरना क्या अशा अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली आहे.

आपल्या मुलाला म्हणजेच जॅकी भगनानी याला त्यांनी हिरो म्हणून लॉन्च केले होते. मात्र जॅकीचे फिल्मी करिअर फार यशस्वी राहिले नाही. यानंतर जॅकीही वडिलांसोबत चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात उतरला.

टॅग्स :अक्षय कुमार