Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर #TheBalaChallengeचा धुमाकूळ, तुम्हीही करू शकता TRY!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 15:48 IST

‘हाऊसफुल 4’चे ‘शैतान का साला’ हे दुसरे गाणे रिलीज झाल्यापासून तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या हे गाणे  सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

ठळक मुद्दे ‘हाऊसफुल 4’  हा सिनेमा पुनर्जन्मावर आधारित आहे.

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याचा आगामी सिनेमा ‘हाऊसफुल 4’ कधी एकदा रिलीज होतो, असे चाहत्यांना झाले आहे. त्यातच ‘हाऊसफुल 4’चे ‘शैतान का साला’ हे दुसरे गाणे रिलीज झाल्यापासून तर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सध्या हे गाणे  सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. इतकेच नाही तर या गाण्यानंतर सोशल मीडियावर  #TheBalaChallenge या चॅलेंजनेही धुमाकूळ घातला आहे.  अनेक कलाकार हे चॅलेंज पूर्ण करत आहेत. 

अक्षय कुमारने सर्वप्रथम हे चॅलेंज सुरु केले आणि सेलिब्रिटीपासून चाहत्यांपर्यंत सगळ्यांनाच या चॅलेंजने वेड लावले. अनेक सेलिब्रिटींनीही हे चॅलेंज पूर्ण करत, त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर, वरुण धवन, आयुष्मान खुराणा, वरुण शर्मा अशा अनेक कलाकारांनी  हे चॅलेंज स्वीकारले आहे.  या अभिनेत्यांनी या #TheBalaChallenge चे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत जे सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. हे चॅलेंज आहे गाण्याची सिग्नेचर स्टेप पूर्ण करण्याचे.  ‘शैतान का साला’ या गाण्यात अक्षय कुमार ‘बाला’च्या रोलमध्ये आहे आणि नेहमीप्रमाणे त्याने हटके डान्स केले आहे. 

 ‘हाऊसफुल 4’  हा सिनेमा पुनर्जन्मावर आधारित आहे. अक्षय कुमारसह रितेश देशमुख, बॉबी देओल, कृती खरबंदा, कृति सेनन, पूजा हेगडे यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २५ ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. 

 

टॅग्स :हाउसफुल 4अक्षय कुमार