Join us
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट नाही तर जाहिरातींनी अक्षय कुमारला केले ‘मालामाल’, एका जाहिरातीसाठी घेतो इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 13:09 IST

ऐकून आश्चर्य वाटेल पण अक्षयच्या कमाईत चित्रपटांपेक्षा तो करत असलेल्या जाहिरातींचा वाटा मोठा आहे.

ठळक मुद्देतूर्तास अक्षय यूकेमध्ये त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमाचे शूटींग करत आहे. तर त्याचे  लक्ष्मी बॉम्ब ,  सूर्यवंशी ,  पृथ्वीराज ,  अतरंगी रे  हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत.

फोर्ब्स 2020 ची  सर्वात जास्त मानधन घेणा-या अभिनेत्यांची यादी समोर  आली आहे. या यादीची खास बाब म्हणजे या यादीत जागा मिळवणारा अक्षय कुमार हा एकुलता एक बॉलिवूड अभिनेता आहे. तो 48.5 मिलियन डॉलर म्हणजेच 362 कोटी रूपयांच्या कमाईसोबत या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. अक्षय वर्षाला चार-पाच सिनेमे करतो, यातून त्याने ही कमाई केली असेल, असे तुम्हाला वाटत असेल तर ते मात्र चूक आहे. होय, ऐकून आश्चर्य वाटेल पण अक्षयच्या कमाईत चित्रपटांपेक्षा तो करत असलेल्या जाहिरातींचा वाटा मोठा आहे.

 सध्या अक्षय कुमार 30 ब्रँडच्या जाहिराती करत आहे. यात कंज्युमर प्रॉडक्टपासून तर लक्झरी उत्पादनांचा समावेश आहे. एका जाहिरातीसाठी अक्षय प्रतिदिन 2 ते 3 कोटी रूपये घेतो. Duff & Phelpsचे मानात तर त्याची ब्रँड व्हॅल्यू 742 कोटींच्या घरात आहे.अक्षय कुमार बॉलिवूडचा सगळ्यांत बिझी अभिनेता आहे. 2019 मध्ये त्याचे चार सिनेमे रिलीज झाले होते आणि हे चारही सिनेमे हिट होते. यातील ‘केसरी’ने 153 कोटींची कमाई केली होती. ‘मिशन मंगल’ने 200 कोटींचा गल्ला जमवला होता. तिसरा सिनेमा ‘हाऊसफुल 4’ने 204 कोटी आणि ‘गुड न्यूज’ या पाचव्या सिनेमाने 201 कोटी रूपयांचा बिझनेस केला होता.

चालू वर्षांतही अक्षयचे चार सिनेमे रिलीज होणार होते. मात्र कोरोना महामारीमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने ते रिलीज होऊ शकले नाही. यापैकी काही सिनेमे लवकरच ओटीटीवर रिलीज होत आहेत. सध्या त्याचे अनेक सिनेमे पाइपलाईनमध्ये आहेत. तूर्तास अक्षय यूकेमध्ये त्याच्या ‘बेल बॉटम’ सिनेमाचे शूटींग करत आहे. तर त्याचे  लक्ष्मी बॉम्ब ,  सूर्यवंशी ,  पृथ्वीराज ,  अतरंगी रे  हे सिनेमे रिलीजच्या प्रतिक्षेत आहेत.

टॅग्स :अक्षय कुमार