Join us

VIDEO : 'लक्ष्मी'च्या नव्या गाण्यात अक्षय कुमारचा गजब अवतार, असा पहिल्यांदाच केला त्याने डान्स...

By अमित इंगोले | Updated: November 4, 2020 11:11 IST

'बुर्ज खलिफा' या गाण्यानंतर आता या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील अक्षय कुमारचा अवतार बघण्यासारखा आहे. 

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी 'गुड न्यूज'नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. त्यांचा आगामी 'लक्ष्मी' सिनेमा सुरूवातीपासून चर्चेचा विषय ठरत आहे. अक्षय या सिनेमात एका वेगळ्याच अवतारात दिसणार आहे. 'बुर्ज खलिफा' या गाण्यानंतर आता या सिनेमातील आणखी एक गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यातील अक्षय कुमारचा अवतार बघण्यासारखा आहे. 

'लक्ष्मी'च्या लेटेस्ट 'बम भोले' गाण्यात अक्षय कुमार किन्नरच्या रूपात डान्स करताना दिसत आहे आणि देवाची प्रार्थना करत आहे. हा बहुचर्चीत सिनेमा ९ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. सिनेमाच्या घोषणेपासूनच सिनेमा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेचा विषय ठरत आहे. या सिनेमाच्या टायटलवर काही हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर टायटलमध्ये बदल करून फक्त 'लक्ष्मी' असं ठेवण्यात आलं. आधी या सिनेमाचं टायटल 'लक्ष्मी बॉम्ब' असं होतं.

सिनेमाचं टायटल बदलल्यावर मेकर्सनी याचं नवं पोस्टरही जारी केलं आहे. ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनला सुद्धा पाठवण्यात आलं आहे. हा सिनेमा तमिळ 'कंचना' सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. ज्याचं दिग्दर्शन राघव लॉरेन्स यानेच केलं होतं. त्यानेच यात मुख्य भूमिका साकारली होती. आता 'लक्ष्मी' सिनेमाचंही दिग्दर्शन त्यानेच केलं आहे.  

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूड