Join us

अक्षय कुमारचा हा चित्रपट पाहायला त्याच्या मुलांना नाही परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 20:30 IST

अक्षयचे अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न झाले असून त्या दोघांना नितारा आणि आरव अशी दोन मुलं आहेत.

ठळक मुद्देमाझ्या मुलांनी माझा गरम मसाला हा चित्रपट पाहू नये असे मला वाटते. कारण या चित्रपटात मी एकाच वेळी चार मुलींना डेट करतो असे दाखवण्यात आले आहे.

अक्षय कुमारने आज बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अक्षयने कॉमेडी, गंभीर अशा सगळ्याच भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या रोमँटिक चित्रपटांना देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अक्षय लवकरच प्रेक्षकांना सूर्यवंशी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात त्याची जोडी कतरिना कैफ सोबत झळकणार आहे. कतरिना आणि अक्षयने नमस्ते लंडन, तीस मार खान यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अक्षयचे अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत लग्न झाले असून त्या दोघांना नितारा आणि आरव अशी दोन मुलं आहेत. अक्षयने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात त्याला त्याच्या खाजगी आयुष्याविषयी देखील काही प्रश्न विचारण्यात आले. अक्षयने देखील या प्रश्नांवर दिलखुलास उत्तरे दिली. अक्षयला या पुरस्कार सोहळ्यात विचारण्यात आले की, तू आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहेस. पण या चित्रपटांपैकी कोणता चित्रपट तू तुझ्या मुलांना दाखवणार नाहीस....

अक्षयने देखील क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या एका चित्रपटाचे नाव घेतले. त्याने सांगितले की, माझा गरम मसाला हा चित्रपट आरव आणि नितारा यांनी पाहू नये असे मी त्यांना सांगेन. हा चित्रपट त्यांना न दाखवण्यामागे काय कारण आहे याविषयी देखील त्याने सांगितले. अक्षय म्हणाला, माझ्या मुलांनी माझा गरम मसाला हा चित्रपट पाहू नये असे मला वाटते. कारण या चित्रपटात मी एकाच वेळी चार मुलींना डेट करतो असे दाखवण्यात आले आहे. मी माझ्या मुलांना सांगू इच्छितो की, आता काळ बदलला आहे. आजकालच्या मुली मेकअपच्या सामानापेक्षा ट्रॅकिंगचे सामान स्वतःकडे जास्त बाळगतात. त्यामुळे तुम्ही काय करत आहात हे त्या सहजपणे ट्रॅक करू शकतात. 

गरम मसाला या चित्रपटात अक्षयसोबतच जॉन अब्राहम, परेश रावल, नीतू चंद्रा, रीमी सेन, राजपाल यादव यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शनने केले होते. 

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना