Join us

ही दोस्ती तुटायची नाय! "पार्टनर इन क्राईम" म्हणत रितेश देशमुखकडून अक्षय कुमारसाठी खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:54 IST

अक्षय आणि रितेशची ही मैत्री नेहमीच प्रेक्षकांसाठी चर्चेचा विषय ठरली आहे.

बॉलिवूडमध्ये काही कलाकारांची मैत्री नेहमीच चर्चेत असते, त्यातलाच एक खास जोडी म्हणजे अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असून त्यांची मैत्री ही फक्त पडद्यापुरती मर्यादित नाही, तर खऱ्या आयुष्यातही ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत. आज अक्षय कुमार त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करतोय. या निमित्ताने रितेशने त्याला खास शुभेच्छा दिल्या.

रितेश देशमुखने अक्षयला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक अतिशय सुंदर पोस्ट शेअर केली. त्याने अक्षयला आपला सर्वात जवळचा मित्र, भाऊ आणि "पार्टनर इन क्राईम"  असे म्हटले आहे. त्याने अक्षयसोबतचे काही खास फोटो पोस्ट केले. यापैकी एक फोटो त्यांच्या आगामी 'हाऊसफुल ५' चित्रपटाच्या सेटवरील आहे, ज्यात दोघेही मस्ती करताना दिसत आहेत.

रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "माझ्या प्रिय मित्राला, भावाला आणि "पार्टनर इन क्राईम" ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुला आयुष्यभर आरोग्य, प्रेम आणि आनंद मिळो. आपण पडद्यावर आणि पडद्याबाहेर अनेक अफलातून क्षण एकत्र घालवले आहेत आणि आता आणखी एका अविस्मरणीय प्रवासासाठी तयार आहोत! तुला खूप प्रेम". अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांनी आतापर्यंत एकत्र अनेक चित्रपटांत धमाल केली आहे. त्यांची जोडी मुख्यतः कॉमेडी आणि एंटरटेनर चित्रपटांत झळकली आहे.  दोघांच्या कॉमिक टायमिंगनं प्रेक्षकांना खूप हसवलंय.

टॅग्स :रितेश देशमुखअक्षय कुमार