Join us

अक्षय कुमार-रोहित शेट्टीचा नवा चित्रपट ‘सूर्यवंशी’ रिलीजआधीच करणार धमाका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 13:30 IST

गतवर्षी एकापाठोपाठ एक असे चार सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करणार आहे. होय, मसाला चित्रपटांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन येतोय व यात अक्षय कुमार मुख्य भूमिका वठवताना दिसणार आहे.

गतवर्षी एकापाठोपाठ एक असे चार सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार प्रथमच रोहित शेट्टीसोबत काम करणार आहे. होय, मसाला चित्रपटांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट घेऊन येतोय व यात अक्षय कुमार मुख्य भूमिका वठवताना दिसणार आहे. रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’मध्ये ‘सूर्यवंशी’ची एक झलक तुम्ही पाहिली असेलच. (‘सिम्बा’च्या अखेरिस ‘सूर्यवंशी’चा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.)अक्षय लवकरच ‘सूर्यवंशी’चे शूटींग सुरु करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षयकडे सध्या ‘मंगल मिशन’ आणि ‘गुड न्यूज’ असे दोन सिनेमे आहेत. हे हातावेगळे करताच, अक्षय ‘सूर्यवंशी’चे शूटींग सुरु होईल. येत्या एप्रिलमध्ये चित्रपटाचे शेड्यूल सुरु होणे अपेक्षित आहे. खास बाब म्हणजे, अक्षय व रोहित हा चित्रपट एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण करणार आहे. कुठलाही चित्रपट सामान्यत: ३ ते ५ शेड्यूलमध्ये पूर्ण होतो. पण ‘सूर्यवंशी’ मात्र एकाच शेड्यूलमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच, रिलीजआधीच ‘सूर्यवंशी’च्या नावावर एक विक्रम चढणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय पोलिस आॅफिसर  सूर्यवंशीच्या रूपात दिसणार आहे.रोहितच्या या चित्रपटात रणवीर सिंग आणि अजय देवगण कॅमिओ रोलमध्ये दिसणार आहेत. तुम्ही ‘सिम्बा’ पाहिला असेन तर चित्रपटाच्या शेवटी ‘सिंघम’ अर्थात अजय देवगण एटीएस सूर्यवंशीला ‘आपसे जल्द ही मुलाकात होगी’ असे म्हणताना दिसतो. ही ‘मुलाकात’ होणार आणि ‘जल्द ही’ होणार...

टॅग्स :अक्षय कुमाररोहित शेट्टीरणवीर सिंगअजय देवगण