Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानच्या ‘या’ चित्रपटासाठी अक्षय कुमारने दिले होते आॅडिशन! झाला होता ‘नापास’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 09:37 IST

अक्षयची ‘डिमांड’ अद्यापही कमी झालेली नाही. आजही तो ‘डिमांडिंग अ‍ॅक्टर’ आहे. याच अक्षयबद्दलची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहित नसावी.

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार हा बी-टाऊनचा एक आघाडीचा अभिनेता आहे, यात काहीही दुमत नाही. सध्या अक्षय एका नाही तर एकाचवेळी पाच चित्रपटांत बिझी आहे. येत्या काळात एकापाठोपाठ एक असे त्याचे पाच चित्रपट रिलीज होणार आहे. यात ‘हाऊसफुल4’,‘2.0’,‘केसरी’,‘गोल्ड’ आणि ‘गुड न्यूज’ या चित्रपटांचा समावेश आहे. एकंदर काय तर अक्षयची ‘डिमांड’ अद्यापही कमी झालेली नाही. आजही तो ‘डिमांडिंग अ‍ॅक्टर’ आहे. याच अक्षयबद्दलची एक गोष्ट तुम्हाला कदाचित माहित नसावी. होय, बॉलिवूडच्या या ‘खिलाडी’ने कधी काळी आमिर खानच्या एका चित्रपटासाठी आॅडिशन दिले होत. होय, या चित्रपटाचे नाव काय तर, ‘जो जीता वही सिकंदर’. याच गाजलेल्या चित्रपटातील शेखर मल्होत्रा या भूमिकेसाठी अक्षयने आॅडिशन दिले होते. विशेष म्हणजे, ‘जो जीता वही सिकंदर’च्या दिग्दर्शकांनी घेतलेल्या या टेस्टमध्ये अक्षय चक्क ‘नापास’ झाला होता. पुढेही भूमिका अक्षयने नाही तर अभिनेता दीपक तिजोरीने साकारली.

 अक्षयने स्वत: एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. ‘दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी मी स्क्रिनटेस्ट दिली होती. पण त्यांना माझा परफॉर्मन्स आवडला नाही. त्यामुळे मला बाहेर काढले गेले,’ असे अक्षयने सांगितले होते.२०१६ मध्ये ‘मामी फेस्टिवल’मध्ये कोरिओग्राफर फराह खान हिनेही याबद्दल सांगितले होते.  फराह या चित्रपटाच्या कास्टिंग टीममध्ये होती. ‘जो जीता वही सिकंदर’चे दिग्दर्शक मन्सूर खान यांना शेखर मल्होत्राच्या भूमिकेसाठी अक्षय योग्य वाटला नव्हता़. त्यामुळे त्यांनी अक्षयला नकार दिला, असे फराहने सांगितले होते.या चित्रपटात अक्षय असता तर आमिर व अक्षयच्या जोडीला रूपेरी पडद्यावर एकत्र पाहण्याची संधी प्रेक्षकांना कधीचीच मिळाली असती. ती एक संधी हुकल्यानंतर अजूनही प्रेक्षकांना या संधीची प्रतीक्षा आहे. लवकरच ती मिळेल, अशी आशा करू यात.

 

टॅग्स :अक्षय कुमार