Join us

चूक नडली! मेरे पेट पर लात मत मारो...म्हणत अक्षय कुमारने मागितली बायकोची हात जोडून माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 14:45 IST

एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षयच्या हाताने ही चूक झाली आणि मग काय?

ठळक मुद्देट्विंकल आणि अक्षय बी टाऊनच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे.

एक छोटीशी चूक आपल्याला इतकी महागात पडेल, याचा विचारही अक्षय कुमारने केला नव्हता. त्यातही चूक अशीही थेट पोटावर लाथ पडायची. पण अक्षयच्या हाताने ही चूक झाली आणि मग काय, या चुकीसाठी त्याला पत्नी ट्विंकल खन्नाची ट्विटरवरून जाहीरपणे माफी मागावी लागली.आता हे चुकीचे नेमके प्रकरण काय, ते आम्ही तुम्हाला सांगतो. तर अक्षय कुमारच्या ‘पॅडमॅन’ या सिनेमाला कालच दोन वर्षे झालीत. त्यानिमित्त काल अक्षयने सोनम कपूर व राधिका आपटेसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत आनंद व्यक्त केला होता. ‘ पॅडमॅन या सिनेमाला दोन वर्षे पूर्ण झालीत. ज्या मुद्यावर लोक बोलायला कचरतात, त्याच मुद्यावर आम्ही एक सिनेमा बनवला, याचा मला आनंद आहे. मला आशा आहे की, गरीबी आणि मासिक पाळीसंदर्भातील कालबाह्य विचार आपण समूळ नष्ट करू शकू,’ असे अक्षयने आपल्या या ट्विटमध्ये लिहिले.

 या ट्विटमध्ये त्याने सोनम कपूर आणि राधिका आपटेला टॅग केले. मात्र ही पोस्ट करताना अक्षय बायकोला विसरला. पण बायकोने त्याची ही चूक नेमकी हेरली. मग काय, तिने ट्विटरवरच नाराजी व्यक्त केली, तेव्हा कुठे अक्षयला जाग आली. अक्षय काय विसरल. तर ‘पॅडमॅन’ संदर्भातील ट्विटमध्ये ट्विंकलचे नाव. होय, कारण ट्विंकल ही ‘पॅडमॅन’ची निर्माता आहे.

अक्षयला त्याची चूक लक्षात आणून देत ट्विंकलने लगेच एक ट्विट केले. ‘तु नक्कीच माझ्या पुढील प्रोडक्शनचा भाग नसणार आहेस’, असा दमच काय तो तिने भरला.  ट्विंकलने खुलेआम त्याला चित्रपटात घेणार नाही असे सांगितल्यावर अक्षयला माफी   मागावीच लागली. ‘कृपया माझ्या पोटावर लाथ नको मारूस़ चित्रपटाची निर्माता ट्विंकल खन्ना, दिग्दर्शक आर बाल्की आणि ज्यांच्याशिवाय या चित्रपट अपूर्ण आहे ते ए मुरूंगनाथम यांची मी माफी मागतो’, असे त्याने लिहिले.

 ट्विंकल आणि अक्षय बी टाऊनच्या आवडत्या जोडीपैकी एक आहे. ट्विंकलने काही वर्षांपूर्वी अभिनय सोडल्यानंतर लेखनास सुरूवात केली आहे तर त्यानंतर तिने चित्रपट निर्मिती करण्याचाही निर्णय घेतला होता.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना