काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) सुरू केले होते आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतीय सैन्याच्या या गुप्त मोहिमेच्या यशानंतर लगेचच चित्रपट निर्मात्यांमध्ये त्यावर चित्रपट बनवण्यासाठी चढाओढ सुरू झाली. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्यात या चित्रपटावरून वाद असल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. आता ट्विंकल खन्ना(Twinkle Khanna)ने याबद्दलचे संपूर्ण सत्य सांगितले आहे.
टाईम्स ऑफ इंडियामध्ये लिहिलेल्या एका कॉलममध्ये ट्विंकल खन्नाने सांगितले की, तिला 'ऑपरेशन सिंदूर' चित्रपटाबाबत अक्षय कुमार आणि विकी कौशल यांच्यात झालेल्या भांडणाची बातमी मिळाली. अशा परिस्थितीत तिने अक्षय कुमारला फोन करून विचारले की हे सर्व खरे आहे का? मग अक्षय कुमारने तिला असे काही सांगितले ज्यामुळे ट्विंकलला वाटले की अभिनेता या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.
अक्षयने ट्विंकलला सांगितले सत्यट्विंकल खन्नाने लिहिले, 'मी आयोडीन सोल्युशनने चीज टेस्ट करू शकते. पण सत्याची लिटमस टेस्ट काय आहे? मला अनेक ट्विट्स आले आणि मी घराच्या प्रमुखाला फोन केला आणि वाद घालू लागले. मी नुकतेच वाचले की तुम्ही 'ऑपरेशन सिंदूर'वर चित्रपट कोण बनवणार यावरुन विकी कौशलशी भांडत आहात. त्याने मोठा श्वास घेतला आणि म्हणाला की, ही खोटी बातमी आहे आणि माझ्या पायाला आग लागली आहे, म्हणून मी तुम्हाला नंतर फोन करेन. जर त्याला फोन ठेवायचा असेल तर त्याने खरोखर चांगलाच बहाणा सांगायला हवा होता.'
एका सीनच्या शूटिंगदरम्यान अक्षय झाला जखमीट्विंकल पुढे म्हणाली की, जेव्हा अक्षय कुमार घरी परतला तेव्हा त्याच्या पायाला खरोखरच पट्टी बांधलेली होती. एका दृश्यासाठी त्याच्या पायाला खरोखरच आग लागली होती. आजकाल, खरे काय आहे हे शोधणे खूप कठीण आहे, म्हणून मी प्रत्येक माहितीकडे संशयाने पाहते.