बॉलिवूडचा ‘खिलाडी’अक्षय कुमार सध्या जोरात आहे. एकापाठोपाठ एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट देण्याचा सपाटा त्याने लावलाय. त्याच्या नुकत्याच येऊन गेलेल्या पाच चित्रपटांची बॉक्सआॅफिसवरची आकडेवारी बघितली तर अक्षय बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी स्टार आहे, हे कुणीही मानेल. अलीकडेच रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘2.0’ने तर आणखीच मोठी झेप घेतली आहे. जगभरात या चित्रपटाने ६०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. पण याचदरम्यान अक्षयच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे. होय, अक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर ‘क्रॅक’ या चित्रपटाची घोषणा केली होती. त्याने या चित्रपटाने पोस्टरही रिलीज केले होते. पण यानंतर नीरज पांडे दिग्दर्शित ‘क्रॅक’ रखडला. अद्यापही या चित्रपटावर काम सुरु झालेले नाही. अशात अक्षयने हा चित्रपट सोडल्याची खबर आहे. खबर तर ही सुद्धा आहे की, ‘क्रॅक’ आता कधीच सुरु होणार नाही.
काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:15 IST
होय, अक्षयचा एक मोठा सिनेमा बंद झाला आहे. होय, काही दिवसांपूर्वी अक्षयने आपल्या सोशल अकाऊंटवर या चित्रपटाची घोषणा केली होती.
काय म्हणता? बंद झाला अक्षय कुमारचा ‘हा’ धमाकेदार चित्रपट?
ठळक मुद्देसध्या अक्षयकडे एकापाठोपाठ एक असे ८ सिनेमे आहेत. या चित्रपटांना अक्षयने आधीच तारखा दिल्यात आहे.