Join us
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय कुमारचा चित्रपट बच्चन पांडेच्या शूटिंगला जैसलमेरमध्ये झाली सुरूवात, फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2021 15:36 IST

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्टअवेटेड सिनेमा 'बच्चन पांडे'च्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. बच्चन पांडेची संपूर्ण टीम जैसलमेरमध्ये आहे. आजपासून या सिनेमाचं शूटिंग जैसलमेरमध्ये सुरू होते आहे. सोशल मीडियावर टीमच्या बर्‍याच सदस्यांनी शूटिंगला जाण्यापूर्वीचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण टीम विमानात दिसते आहे.

जैसलमेरच्या हनुमान चौकात सुरू असलेल्या शूटिंगसाठी अक्षय कुमारसोबत पंकज त्रिपाठी, अर्शद वारसी आणि क्रिती सॅनॉन पोहोचले आहेत. जैसलमेरमध्ये  जवळपास 2 महिने शूटिंग चालणार असल्याची माहिती आहे.

बच्चन पांडेमधील अक्षय कुमारचा लूक पाहून चाहते  चकीत झाले होते. वाढलेली दाढी, जबरदस्त बॉडी, गळ्यातील सोनसाखळ्या आणि भयावह डोळे असा त्याचा अवतार होता. या लूकमध्ये अक्षय कुमार अत्यंत हटके अंदाजात दिसत होता. या सिनेमात अक्षय कुमार एका अभिनेता बनू इच्छिणाऱ्या एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. अक्षयच्या मित्राच्या भूमिकेत अर्शद वारसी दिसणार आहे तर क्रिती सनॉन पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.  ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट फरहाद सामजी दिग्दर्शित करणार असून साजिद नाडियाडवाला चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अलीकडेच अक्षयने 'अतरंगी रे' सिनेमाचे शूटिंग पूर्ण केलं. अक्षयसोबत या सिनेमात सारा अली खान आणि धनुष दिसणार आहे.  

टॅग्स :अक्षय कुमार