Join us

प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 12:47 IST

कोण आहे हा हँडसम स्टारकिड?

सिनेमा, मालिकांमध्ये काम मिळवण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. मुंबईत येऊन संघर्ष करतात. स्टारकीड असूनही काही मुलांना संघर्ष करावा लागला आहे. असाच एक स्टारकिड जो वयाच्या ३६ व्या वर्षीही काम शोधत आहे. आता कुठे त्याला सनी देओलच्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली आहे. कोण आहे हा स्टारकिड?

८०-९० च्या दशकात सिनेमांमध्ये दिसलेली एक अभिनेत्री जिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. मात्र आज त्या अभिनेत्रीचा मुलगा ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये दार ठोठावत आहे. ही अभिनेत्री आहे नफीसा अली (Nafisa Ali). नफिसा यांनी 'लाईफ इन अ मेट्रो' सिनेमात धर्मेंद्र यांच्यासोबत काम केलं होतं. शिवाय 'साहिब बीवी और गँगस्टर ३' मध्येही त्या होत्या. नफिसा अली आणि सलमान खानच्या कुटुंबाचं जवळचं नातं आहे. सलीम खान यांच्या 'जुनून' सिनेमात त्यांनी काम केलं होतं. नफीसा अली यांच्या मुलाचं नाव अजीत सोढी आहे. अजीत बऱ्याच काळापासून बॉलिवूडमध्ये संघर्ष करत आहे.

नफीसा अली यांना नुकतंच पुन्हा कॅन्सरचं निदान झालं आहे. त्या दुसऱ्यांदा कॅन्सरशी झुंज देत आहेत. तर त्यांचा मुलगा अजीत सोढीबद्दल खूप कमी जणांना माहित असेल. अजीतने सेकंट युनिट असिस्टंट डायरेक्टर म्हणून कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमात काम केलं होतं. त्याने हा एकच मोठा सिनेमा केला. आता त्याला सनी देओलच्या आगामी 'बॉर्डर २'मध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. हा त्याचा पहिलाच सिनेमा असणार आहे. 

टॅग्स :नफीसा अलीबॉलिवूड